एक्स्प्लोर
उजनी धरणाची वजाकडून शून्याकडे वाटचाल

पंढरपूर: तब्बल दहा महिन्यानंतर उजनी धरणाने वजाकडून शून्य पातळीकडे वाटचाल केली आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात 30 टीएमसी पाणी जमा झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
गेल्या 10 महिन्यांपासून वजा पातळीत असलेल्या उजनी धरणाने यंदा 4 जुलैला ऐतिहासिक निचांकी गाठत वजा 53.56 इतकी पातळी गाठली होती. आज शून्य पातळी ओलांडताना उजनी धरणात 63 टीएमसी इतकं पाणी साठलं आहे.
उजनी हे 117 TMC क्षमतेचे धरण असून याच्या मृत साठ्यात 63 TMC पाणी साठविण्याची क्षमता आहे. आज शून्य पातळी ओलांडताना आता धरणात 63 TMC पाणी साठले आहे.
सध्या पुण्यातील धरणांतून जवळपास 82 हजार क्युसेक विसर्गाने धरणात पाणी येत आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अजून 53 TMC पाणी आवश्यक आहे. या धरणाच्या पाण्यावर पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील बराचसा भाग अवलंबून आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
