एक्स्प्लोर

उदगीरच्या दुग्धभुकटी प्रकल्पाला घरघर दुधाचे दर अन् उत्पादनही घटल्याने प्रकल्प बंद अवस्थेत

उदगीर ही लातूर जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ आहे. अहमदपूर, जळकोट, देवणी, शिरूरअंतनपाळ या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा शासकीय दुग्धभुकटी प्रकल्प उभारण्यात आला होता.

लातूर : केवळ उदगीर तालुकाच नव्हे तर औसा, देवणी, जळकोटसह अहमदपूर तालुक्यातील दुध उत्पादकांसाठी उदगीर येथील दुग्धभुकटी प्रकल्प हा वरदान ठरला आहे. मात्र, दिवसेंदिवस दुधाचे घटते उत्पादन आणि गडगडलेले दर यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तर परवड सुरूच आहे पण येथील उलाढालही ठप्प आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. बेभरवशाची शेती असल्याने शेतकरी दुग्धव्यवसायावर भर देत आहेत. त्यामुळेच 1979 साली उदगीर येथे या दुग्धभुकटी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. पण या शासकीय प्रकल्पावर दुधाची आवक दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू देखील करता येत नाही अशी अवस्था झाली आहे. उदगीर ही लातूर जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ आहे. अहमदपूर, जळकोट, देवणी, शिरूरअंतनपाळ या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा शासकीय दुग्धभुकटी प्रकल्प उभारण्यात आला होता.

सुरवातीच्या काळात 8 ते 10 हजार लिटर दुधाची आवक होत असल्याने सर्व काही सुरळीत होते. परंतु, काळाच्या ओघात ना दर बदलला ना येथील प्रक्रिया. तर दुसरीकडे खासगी दुध डेअरीवरील दर दिवसेंदिवस वाढत होते शिवाय दुध उत्पादकांना दूध वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.त्यामुळे या शासकीय दुधभुकटीवर केवळ 2 हजार 300 लिटर दुधाची आवक होत आहे तर प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी 6 हजार लिटर दुधाची आवश्यकता असते. यामुळेच 26 जून पासून हा प्रकल्प बंद आहे. तांत्रिक करण सांगितले जात असले तरी सर्व मशनिरीचा पुरवठा झाला आहे.पण आवश्यक असलेले दूध दिवसेंदिवस घटत आहे. शिवाय खासगी डेअरी वाढत असल्याने शेतकरी या सरकारी प्रकल्पाकडे फिरकत नाहीत. दुध उत्पादकांनी शासकीय डेअरीकडे वळावे म्हणून विशेष असे प्रयत्न केले जात नाहीत हे विशेष. तूर्त या परिसरातील शेतकऱ्यांना अंबाजोगाई येथील प्रकल्पाचा पर्याय असला तरी उदगीरच्या वैभवात भर टाकणाऱ्या या प्रकल्पाला घरघर लागली हे नक्की.. प्रशासकीय अनास्था केवळ उदगीर तालुकाच नव्हे तर परिसरातील शेतकऱ्यांना या दुग्धभुकटी प्रकल्पाचा फायदा झाला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकल्प बंद असल्याने शेतकऱ्यांची तर गैरसोय होत आहेच पण तालुक्याचा विकास खुंटत आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले आहे. पण आवश्यक असलेले दुध उत्पादन वाढविण्यासाठी कोणतेही पर्याय अवलंबले जात नाही हेच वास्तव आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget