एक्स्प्लोर

'सामना'चं संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडलं, संजय राऊतांकडे जबाबदारी

सामना हे देशातलं एकमेव असं दैनिक आहे जे कायम चर्चेत असतं. म्हणजेच देशभरातील प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमंसुद्धा एखाद्या मुद्द्यावर 'सामना'च्या अग्रलेखात काय लिहिलंय यावर लक्ष ठेवून असतात.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्राचं संपादकपद सोडलं आहे. 'सामना'ची संपूर्ण जबाबदारी आता खासदार संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संजय राऊतच आता सामनाचे कार्यकारी संपादक असतील. मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी उद्धव ठाकरे 'सामना'च्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. 'सामना' हे देशातलं एकमेव असं दैनिक आहे जे कायम चर्चेत असतं. म्हणजेच देशभरातील प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमंसुद्धा एखाद्या मुद्द्यावर 'सामना'च्या अग्रलेखात काय लिहिलंय यावर लक्ष ठेवून असतात. 'सामना'त छापलेली बातमी किंवा अग्रलेख इतरांसाठी 'बातमी'चा विषय असतो. शिवसेना सत्तेत असो किंवा बाहेर, या पक्षाची भूमिका नक्की काय आहे हे पाहण्यासाठी 'सामना'कडे कायम लक्ष असतं. सामना'चं संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडलं, संजय राऊतांकडे जबाबदारी संजय राऊत कोणावर टीकेचे बाण सोडणार? खरंतर पक्षप्रमुखच 'सामना'च्या संपादकपदी असल्याचं पाहायला मिळत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनाची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर आली होती. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याने त्यांना वृत्तपत्राचं संपादकपद सोडावं लागलं. त्यामुळे दैनिकाची सर्वस्वी जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संजय राऊत 'सामना'चे कार्यकारी संपादक म्हणून काम करत आहेत. आता त्यांच्याकडे जबाबदारी असल्यामुळे ते कोणावर आणि कोणत्या मुद्द्यावर टीकेचे बाण सोडतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे. 'सामना'ची स्थापना बाळासाहेबांनी केली नाही? शिवसेना म्हणजे सामना आणि सामना म्हणजे शिवसेना असं समीकरण झालं आहे. पण 'सामना'ची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केलीच नाही, हे वाचून आश्चर्य वाटेल. 1966मध्ये शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हा 'मार्मिक' या व्यंगचित्र साप्ताहिकातून शिवसेनेची भूमिका मांडली जायची. 1988 साली शिवसेनेचे दैनिकही असावे अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली आणि त्याबाबत विचार होऊ लागला. बाळासाहेबांनी 'सामना' हे नावही सुचवलं. परंतु नोंदणीच्या वेळी हे नाव सोलापुरातील बार्शीमध्ये राहणारे पत्रकार आणि संपादक वसंत कानडे यांच्या नावावर होतं. सुभाष देसाई बार्शीत गेले असताना त्यांची वसंत कानडे यांच्यासोबत भेट झाली. आपल्या बातम्या आणि लेख यावेत या माफक अटीवर वसंत कानडे यांनी 'सामना' नावाला परवानगी दिली. शिवसेनेचा 'सामना' दैनिक स्वरुपात असला तरी कानडे यांचा सामना साप्ताहिक स्वरुपात प्रसिद्ध होत होता. 2002 साली वसंत कानडे यांचं निधन झालं.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी नेमके कुठे? शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर दाखल, आदित्य ठाकरेंचा इशारा 
ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी नेमके कुठे? शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर दाखल, आदित्य ठाकरेंचा इशारा 
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा

Embed widget