Uddhav Thackeray on Sunil Tatkare : शरद पवारांनीही ठरवलंय, गद्दार सुनील तटकरेंना पाडायचं, पेणच्या सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray on Sunil Tatkare : उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेसाठी रायगड दौऱ्यावर आहेत. त्यांची पहिली सभा पेणमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी सुनील तटकरेंवर सडकून टीकास्त्र सोडले.
पेण (रायगड) : मोदी लाटेतही रायगड वाहून गेला नाही, यावेळी, तर त्सुनामीसारखं मतदान होणार आहे. शरद पवारांनीही ठरवलंय, गद्दार सुनील तटकरेंना पाडायचं, अशा शब्दात पेणच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेसाठी रायगड दौऱ्यावर आहेत. त्यांची पहिली सभा पेणमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी सुनील तटकरेंवर सडकून टीकास्त्र सोडले.
पवारही म्हणाले या गद्दारांना पाडावे लागणार
उद्धव ठाकरे म्हणाले की, चारशे पार म्हणता नितीशकुमार का लागतात? भ्रष्टाचार करून भाजपत या हीच मोदी गॅरेंटी आहे. शरद पवार श्रीवर्धनमध्ये बोलताना मला म्हणाले, या गद्दारांना पाडावे लागणार आहे. त्यांची सुद्ध तयारी आहे. मी कल्याण दौरा केल्यानंतर मोदी महाराष्ट्र दौऱ्यात घराणेशाहीवर बोलून गेले. घराणेशाहीला विरोध आहेच, पण जी गद्दारांची घराणेशाही आहे, गद्दारी करणारी घराणेशाही आहे त्यांना भाजपने सांगावे, आम्ही तिकीट देणार नाही, घराणेशाही बंद करणार आहे. असेल हिंमत, तर दाखवावी. सुनील तटकरेंना राज्यसभेत, विधानपरिषेदत पाठवणार नाही असे सांगावे. लोकसभेत निवडून येऊ शकत नसल्याने मागच्या दाराने प्रवेश करतील. मोदी घराणेशाहीवर बोलतात, तर सांगितलं पाहिजे गेट आऊट, तु आणि तुझी मुलगी घरी काय ते करा. माझ्या पक्षात स्थान नाही. आम्ही कडवट हिंदूत्वामुळे आपल्यासोबत आलो, भाजपने सांगावं त्यांचं हिंदुत्व काय आहे.
आज पेण शहर हायस्कूलच्या प्रांगणात निष्ठावंत शिवसैनिकांसोबत संवाद साधून पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी जनसंवाद दौऱ्यास प्रारंभ केला. महाराष्ट्रासोबत गद्दारी करणाऱ्या प्रत्येकाला इथली माती गाडल्याशिवाय राहत नाही, हा इतिहास आहे. ह्याच इतिहासाची पुनरावृत्ती करायची असेल… pic.twitter.com/x5gS1Em5ry
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) February 1, 2024
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. हाच धागा पकडत ठाकरे यांनी अजित पवार यांना दुसऱ्यांदा मिळालेल्या क्लीनचिटवरून हल्लाबोल केला. सोरेन यांना अटक आणि अजित पवार यांना क्लिनचीट, या भाजपत प्रवेश करा, हीच मोदींची गॅरेंटी असल्याचा घणाघात ठाकरे यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या