मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे अनेक ठिकाणी गैरहजर, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणीही कॉमेंट केलेली नाही : रावसाहेब दानवे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभागृहातील अनुपस्थितीबाबत विरोधक विविध वक्तव्य करत आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणीही काहीही कॉमेंट केली नसल्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
लातूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतीबाबत कोणीही काहीही कॉमेंट केली नसल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. सध्या त्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीबाबत चर्चा होत आहे. ते आजारी आहेत म्हणून हजर नाहीत. मात्र, ते जसे मुख्यमंत्री झालेत तसे ते अनेक ठिकाणी गैरहजर असतात असे रावसाहेब दानवे म्हणाले. दानवे हे आज लातूर दैऱ्यावर आले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे अधिवेशनाला आले नाही. यात काही नवीन घडतय अस नाही. कारण, मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात किती वेळा आले? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी बुधुवारी केला होता. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होण्याच्या आधी उद्धव ठाकरे यांची तब्बेत ठीक असून, ते सभागृहात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित राहीले नाहीत. यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावर आज बोलताना दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत कोणीही काहीही कॉमेंट केली नसल्याचे सांगितले.
राज्य सरकारमुळे ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरुन रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारच्या भुमिकेमुळे ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. परळी-नगर-बीड या रेल्वे मार्गावरील कामासाठी राज्य सरकारने कालच पैसे दिले असल्याचे दानवे म्हणाले. केंद्राचा देखील निधी आहे. त्यामुळे अंतिम मुदतीत ते काम पूर्ण होईल, असा विश्वासही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर नगरसोल-पुणतांबा या पिठ लाइनचा विषय पण मार्गी लागेल. तसेच लातूरच्या पिठलाइनसाठीही काम प्रस्तावित असल्याची माहिती दानवे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरुन भाजपचे नेते विविध वक्तव्य करत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्रीपदाचा चार्ज उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याकडे द्यावा असे विधान केले होते. भाजपचे राज्यातील नेते मुख्यमंत्र्याबाबत विविध विधाने करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: