एक्स्प्लोर

भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा 

Union Minister Rajnath Singh Dhule Dondaicha Tour : केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. विविध कामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी पाकिस्तान, चीनला इशारा दिला

धुळे : भारताने आजवर आक्रमण केलेलं नाही किंवा कब्जा केलेला नाही. भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही. आम्ही इकडंच नाही तर तिकडं जाऊनही मारु शकतो,  अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.  सगळे बदलू शकतात पण शेजारी बदलू शकत नाहीत.  मात्र आम्ही भारत मातेचे मस्तक झुकू देणार नाहीत, असं राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांच्या हस्ते दोंडाईचा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन झालं. 

वीरांची भूमी म्हणून महाराष्ट्र भूमीची ओळख 
 तुम्ही सगळे कसे आहात असं म्हणत राजनाथ सिंह यांनी भाषणाला मराठीतून सुरुवात केली.  राजनाथ सिंह म्हणाले की,  मी उत्तरप्रदेशातून आलो आहे.  उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यांचा जवळचा संबंध आहे. मी महाराष्ट्रात जेव्हा येतो तेव्हा मला खूप आनंद होतो.  वीरांची भूमी म्हणून महाराष्ट्र भूमीची ओळख आहे.  आजही केवळ महाराष्ट्रात नाही तर सगळीकडे शिवाजी महाराज भरलेले आहेत.  अमेरिका धनवान आहे म्हणून तिथले रस्ते चांगले नाही तर सरकार धनवान आहे म्हणून रस्ते चांगले आहेत. नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली उत्तम काम सुरू आहे, असं सिंह म्हणाले. 

सिंह म्हणाले की,  बिपीन रावत यांच्या नावाने पहिला मार्ग इथे सुरू झाला याचं श्रेय दोंडाईचा नगरपालिकेला जातं. देशाच्या जवानांना सुरक्षित ठेऊ आणि देशाचा आपण विकास करू असंही ते म्हणाले.  राममंदिराची निर्मिती न्यायव्यस्थेतून झाली आहे, असंही ते म्हणाले.

सिंह म्हणाले की, जेव्हापासून देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून फक्त आश्वासने दिली गेली.  नेत्यांवरील विश्वास कमी झाला आहे. मात्र आम्ही जे बोलू ते करून दाखवू.  2019 च्या जाहीरनाम्यात जे लिहिलं होतं ते पूर्ण करू, असं सिंह म्हणाले.

विविध विकास कामांचे लोकार्पण 
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आलं. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांच्या स्मारकाचे  उद्घाटन झालं.  त्यांच्या हस्ते जनरल बिपिन रावत या रोडचे उद्घाटन देखील झालं.  तसेच श्रीमंत राजे दौलतसिंह रावल यांचा पुतळा, शहीद अब्दुल हमीद स्मारक आणि वॉर ट्रॉफी पुतळ्याचे देखील राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण झालं.  राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा लावण्यात आला होता. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget