एक्स्प्लोर
शिवसेनेचा 'हा' नेता उद्या केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (उद्या ) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींच्या मंत्रीमंडळातील इतर मंत्रीदेखील शपथ घेतली. यादरम्यान एनडीएमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला किती मंत्रीपदं मिळणार, शिवसेनेचा कोणता नेता केंद्रात मंत्री होणार याची सर्वांनाच उस्तुकता आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (उद्या ) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींच्या मंत्रीमंडळातील इतर मंत्रीदेखील शपथ घेतली. यादरम्यान एनडीएमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला किती मंत्रीपदं मिळणार, शिवसेनेचा कोणता नेता केंद्रात मंत्री होणार याची सर्वांनाच उस्तुकता आहे. याचदरम्यान शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत उद्या मंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 350 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी इतर मंत्र्यांचेही शपथविधी होतील. एनडीएतील सेकेंड लार्जेस्ट पार्टी (एनडीएतील सर्वाधिक खासदार असलेला दुसरा पक्ष) असलेल्या शिवसेनेला आता दोन कॅबिनेट मंत्रीपदं आणि एका राज्यमंत्रीपदाची आशा आहे. परंतु उद्या शिवसेनेचा एकच खासदार मंत्रीपदाची शपथ घेईल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
व्हिडीओ पाहा
कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेनेचे काही खासदार गेल्या काही दिवसांपासून लॉबिंग करत आहे. दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी हे तिघेजण त्यामध्ये आघाडीवर आहेत. परंतु अरविंद सावंतांचे नाव फायनल झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
वाचा : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे स्थान कसं असणार?
#मराठीतशपथ मोहिमेला 'माझा'चा पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी | ABP Majha
आठवलेंचं मंत्रीपद पक्कं?
दरम्यान, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे मंत्रिपद कायम राहणार का हादेखील सर्वांना प्रश्न आहे. आठवलेंना नाकारले तर त्याची जास्त चर्चा होऊ शकते. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर भाजप आठवलेंना डावलण्याची रिस्क घेणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement