Uddhav Thackeray Barsu Visit LIVE : पर्यावरणाची हानी होणार असेल तर प्रकल्प नको : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Barsu Visit LIVE : उद्धव ठाकरे आज रत्नागिरीतील बारसू गावाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे इथे रिफायनरी विरोधक तसंच समर्थकांची भेट घेणार आहेत.
LIVE
Background
Uddhav Thackeray Barsu Visit : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (6 मे) रत्नागिरीतील (Ratnagiri) बारसू (Barsu) गावाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे इथे रिफायनरी विरोधकांची भेट घेणार आहेत.
सकाळी नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे मुंबईतील मातोश्री निवासस्थानाहून बारसूसाठी रवाना होतील. जुहू इथून हेलिकॉप्टरने ठाकरे बारसू इथे जातील. दरम्यान उद्धव ठाकरे हे रिफायनरी विरोधकांना भेटणार आहेतच मात्र समर्थक देखील त्यांची भेट घेणार आहेत.
दोन ठिकाणी विरोधकांची भेट होणार
उद्धव ठाकरे दोन ठिकाणी विरोधकांना भेटणार आहेत. सोलगाव फाट्यावर देवाचे गोठणे, गोवीळ आणि गिरमादेवी कोंड या ठिकाणी बारसू आणि परिसरातील विरोधकांसोबत उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास गिरमादेवी कोंड इथे उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बारसूमध्ये
बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीचं माती परीक्षण सुरु आहे. परंतु रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेही बारसूमध्ये जात आहेत. रिफायनरीच्या मुद्द्यावर आजवर जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्या आरोपांना उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यात उत्तर देणार का, हा प्रश्न आहे.
उद्धव ठाकरे समर्थक आणि विरोधकांना भेटणार : सचिन अहिर
"आजचा दिवस महत्त्वाचा आहे. रोजगार जरी असला तरी ती जागा कोणाची आहे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. पक्षप्रमुख बारसूला जात आहेत आणि लोकांना समजून घेणार आहेत. उद्धव ठाकरे समर्थक आणि विरोधक या दोघांनाही भेटणार आहे. तसंच आदित्य ठाकरे देखील पुण्यात वेताळ टेकडी आणि चिपको आंदोलकांच्या भेटीसाठी जात आहेत. दोन्ही विषय पर्यावरणाविषयी आहेत, त्यामुळे महत्त्वाचे आहेत," असं ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.
हजारो रिफायनरी समर्थक उद्धव ठाकरेंची भेट घेणार
यावेळी रिफायनरी समर्थकही ठाकरेंची भेट घेऊन, संमतीपत्रं सादर करणार आहेत. रिफायनरी प्रकल्पाला राजापूर तालुक्यात असलेले समर्थन ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यासाठी राजापुरातील विविध 51 संघटना, ग्रामपंचायतींचे सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारो समर्थक त्यांची भेट घेणार आहेत.
राजापूरमध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा
राजापूरमध्ये आज रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा निघणार आहे. सकाळी 10 वाजता राजापूर शहरातील जवाहर चौक येथे हजारोंच्या संख्येने समर्थक एकत्र येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे, प्रमोद जठार हजर असणार आहेत. यावेळी रिफायनरीसाठी असलेले समर्थन दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Uddhav Thackeray Barsu Visit : पर्यावरणाची हानी होणार असेल तर प्रकल्प नको : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
पर्यावरणाची हानी होणार असेल तर प्रकल्प नको
बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध
बारसूबाबत दिशाभूल करण्यात आली
वादग्रस्त प्रकल्प कोकणात नको
सरकारकडून दडपशाही सुरु आहे
राजापूरमध्ये नितेश आणि निलेश राणे यांच्या नेतृत्त्वात रिफायनरी समर्थनार्थ मोर्चा, उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Rajapur Refinery Supporters March : राजापूरमध्ये रिफायनरी समर्थकांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरु आहे. मातोश्रीवर खोके पोहोचावेत म्हणून बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीला विरोध सुरु आहे. ते पत्र लिहिण्यासाठी 100 कोटी घेतले, असं कळलं, असं नितेश राणे म्हणाले. प्र
कातळशिल्प परिसरात गोंधळ, वरुण सरदेसाईंना पोलिसांनी अडवलं
#barsurefinery कातळशिल्प परिसरात गोंधळ, वरुण सरदेसाईंना पोलिसांनी अडवलं #ratnagiribarsurefineryprotest https://t.co/QGjufsATy2 pic.twitter.com/1qioVd2dvU
— ABP माझा (@abpmajhatv) May 6, 2023
रिफायनरीचं समर्थन करुन दाखवाच; उद्धव ठाकरेंचं राज्यकर्त्यांना आवाहन
LIVE UPDATES : मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही, रिफायनरीचं समर्थन करुन दाखवाच; उद्धव ठाकरेंचं राज्यकर्त्यांना आवाहन #UddhavThackerayhttps://t.co/QGjufsATy2 pic.twitter.com/jfwE9xx2GW
— ABP माझा (@abpmajhatv) May 6, 2023
हुकुमशाहीचा विचार केला तर हुकुमशाही मोडून टाकू : उद्धव ठाकरे
LIVE UPDATES : हुकुमशाहीचा विचार केला तर हुकुमशाही मोडून टाकू : उद्धव ठाकरे #UddhavThackeray https://t.co/6b5fvvR0Of pic.twitter.com/mjLDcvSntu
— ABP माझा (@abpmajhatv) May 6, 2023