एक्स्प्लोर

Maharashtra Corona : निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गेल्या दीड महिन्यात राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सात पटीने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली.

मुंबई: कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे. 

फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा
कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या  ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

  • ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोविड चाचणी करुन घ्या.
  • गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा.
  • बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.
  • ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी.
  • आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी.
  • ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.
  • येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजार देखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनी देखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; अहिल्यानगरमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; अहिल्यानगरमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
Beed Crime Dhananjay Deshmukh: मोठी बातमी! अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिली; दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिली; दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
Vidhan Parishad Election 2026: पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
Embed widget