(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लढा कोरोनाशी! शहरांपासून खेड्यापाड्यात धावणारी 'लालपरी' थांबणार
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्र बंद असणार आहे. अत्यावश्यक सेवा यातून वगळ्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेली एसटी बसही उद्यापासून बंद असणार आहे. 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात लॉक डाऊन असणार आहे,
मुंबई : राज्यातील मोठ्या शहरांना गावांना आणि गावांना खेड्यापाड्यात जोडणारी लालपरी म्हणजेच एसटी बस उद्यापासून थांबणार आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहून राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यात लोकल वाहतूक, रेल्वे वाहतूक, मेट्रो, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या, खासगी बससह सरकारी बस सेवाही बंद करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्याची धोका वाढला आहे. परिणामी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात शहरातील वाहतूक व्यवस्थेसोबत ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली एसटी बसही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात लॉक डाऊन असणार आहे. गरज पडल्यास यावर निर्णय घेण्यात असल्याचीही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तर, लोकल बस वाहतूक ही केवळ अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वर्क फ्रॉम होमचं आवाहनही केलं आहे. तसेच बंदच्या काळात घरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना केलं आहे.
Coronavirus | सावधान! बाहेर फिरू नका; मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात संचारबंदी लागू
आपण तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर कोरोना विषाणू चार स्टेजमध्ये पसरतो. सध्या देशात आणि राज्यातील सरकार चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळताना दिसत आहे. राजस्थान, पंजाब नंतर आता महाराष्ट्रातही अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आलं आहे. आज आपण या आजाराच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहोत. चौथा टप्पा तर खूपच गंभीर असेल. त्याला तोंड देण्याची तयारी आतापासून करणे गरजेचे आहे. यासाठी आता सर्वसामान्य नागरिकांना सरकारच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता तासाला वाढत आली आहे. देशात आता कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 396 साली आहे. तर, आतापर्यंत सात जणांचा यातत मृत्यू झाला आहे. Janta Curfew | Coronavirus | जनता कर्फ्यूला राज्यातील ग्रामीण भागात कसा प्रतिसाद मिळाला?