एक्स्प्लोर

पवारांच्या कॉलरबाजीवर उदयनराजे म्हणतात....

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंच्या कॉलरच्या स्टाईलवरुन मिश्किल भाष्य केलं होतं.

सातारा: शरद पवारांना आपली कॉलरची स्टाईल आवडली, याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांनी दिली. ते काल कराडमध्ये बोलत होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंच्या कॉलरच्या स्टाईलवरुन मिश्किल भाष्य केलं होतं. साताऱ्यात राष्ट्रवादी अंतर्गत सुरु असलेल्या गटबाजीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल शब्दात फटकेबाजी केली होती. आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात, असं म्हणत खासदार उदयनराजे यांच्या स्टाईलवर पवारांनी मार्मिक शेरेबाजी केली होती. त्यावर आता उदयनराजेंनी आनंद व्यक्त केला. "शरद पवार हे आदरणीय व्यक्ती असून, त्यांना माझी कॉलरची स्टाईल आवडली, कुणीतरी मला दाद दिल्याचे समाधान वाटले",  असं उदयनराजे म्हणाले. मी असल्यावर सर्वांची कॉलर सरळ : शरद पवार    दरम्यान, या पत्रकार परिषदेत उदनयराजेंनी साताऱ्यातल्या राष्ट्रवादीअंतर्गत सुरु असलेल्या कलहावरही खुमासदारपणे भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला तिकीट देईलच अन्यथा अपक्ष लढण्याचीही तयारी आहे, असं वक्तव्य उदयनराजेंनी केलं. हिम्मत असेल तर मैदानात या “माझे पोट राजकारणावर चालत नाही. लोकशाही आहे म्हणूनच गप्प आहे, राजेशाही असती तर एका एका आमदाराला दाखवले असते. हिम्मत असेल तर मैदानात या. अपक्ष उमेदवारी भरुन एकाएकाची पुंगी वाजवतो की नाही ते बघाच”, असा इशारा उदयनराजेंनी दिला. मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीत काय चर्चा झाली हे आत्ताच कशाला सांगू?  चर्चा झाली एव्हढं नक्की, असं उदयनराजे म्हणाले. चार दिवसांपूर्वीच उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. साताऱ्यात आयोजित करण्यात आलेला 'राजधानी महोत्सव' आणि इतर विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी उदयनराजे साताऱ्याहून मुंबईला आले होते. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर फडणवीस आणि उदयनराजे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली. साताऱ्यामध्ये 25 ते 27 मे दरम्यान 'राजधानी महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत 'राजधानी महोत्सव' होणार आहे. संबंधित बातम्या मी असल्यावर सर्वांची कॉलर सरळ : शरद पवार   खासदार उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'वर्षा'वर  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget