एक्स्प्लोर
गडचिरोलीत दारु समजून अॅसिड प्यायल्याने दोघांचा मृत्यू
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील टेकला येथे मोहफुलाची दारू समजून अॅसिड प्यायल्याने दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. टेकडा गावात नवा पंडूम सण साजरा करण्यात आला. यावेळी ही घटना घडली.
कमली लालसू वड्डे (23) व गोंगलू पुसू नरोटी (70) या दोघांनी मोहाची दारु समजून अॅसिड प्राशन केले. कमली वड्डे या महिलेने गोंगलू पुसू नरोटी याला तिच्या घरी दारू पिण्यासाठी बोलविले होते. सदर महिलेने घरात असलेल्या अँसिडच्या बाटल्या काढल्या व प्रथम तिने स्वत: त्या बाटलीतील अँसिड दारू समजून प्राशन केले. त्यानंतर त्याच बाटलीतील अँसिड गोंगलू पुसू नरोटी यालाही पिण्यास दिले.
दोघांनी मिळून अँसिड पूर्णपणे संपविले. त्यानंतर थोड्याच वेळात कमली वड्डे ही मृत्यूमुखी पडली. कमली यांना पाच महिन्याचा एक मुलगा आहे. तर गोंगलूला विषबाधा झाली म्हणून कुटुंबीयांनी लोकबिरादरी रूग्णालय हेमलकसा येथे दाखल केले. त्याच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. त्याचाही मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement