एक्स्प्लोर
नाशकातील व्यावसायिकाची लूट आणि हत्येप्रकरणी दोघे ताब्यात
गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकच्या फुलेनगर परिसरातून दोघांना ताब्यात घेतलं आहे.

नाशिक : नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात 6 लाखांची लूट करुन अविनाश शिंदे या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकच्या फुलेनगर परिसरातून दोघांना ताब्यात घेतलं आहे. अविनाश शिंदे हे नाशिकमधील सुपर ग्राहक बाजार या मिनी सुपर मार्केटचे संचालक होते. रात्री ते दुकान बंद करुन घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अविनाश यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र अविनाश शिंदे यांनी विरोध करताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांच्या हातात असलेली पैशांची बॅग घेऊन पळून गेले. अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात अविनाश शिंदे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक रवाना करण्यात आलं होतं. दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी संशयितांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अविनाश शिंदे यांच्या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भयभीत झालेल्या इंदिरानगर परिसरातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























