एक्स्प्लोर
Advertisement
ठाण्यात रिक्षात तरुणीवर अतिप्रसंग करणारे 2 नराधम अटकेत, रिक्षाही ताब्यात
ठाणे : ठाण्यातील रिक्षातील विनयभंगप्रकरणी नौपाडा पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली आहे आणि रिक्षा ताब्यात घेतली आहे. चालत्या रिक्षात रिक्षाचालक आणि सहप्रवाशानं संगनमतानं 23 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करुन तिला रिक्षातून फेकून दिलं होतं. बुधवारी रात्री 9.30च्या सुमारास ही घटना घडली होती.
नराधमांचा छडा लावण्यासाठी ठाणे पोलिसांनी एक ते दोन हजार रिक्षांची तपासणी केली.
घटना काय घडली?
23 वर्षीय तरुणी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शेअर रिक्षाने चितळसर मानपाडा येथे घरी निघाली होती. तीन हात नाका परिसरात ती बसली तेव्हा रिक्षात एकच सहप्रवासी होता. रिक्षा चालकाने अन्य प्रवासी न घेता रिक्षा सुसाट नेली.
रिक्षा चितळसर मानपाडाकडे नेण्याऐवजी पोखरण रोडकडे नेल्याने तरुणी सावध झाली. सहप्रवाशाने रिक्षा चालकाच्या संगनमताने तरुणीवर धावत्या रिक्षातच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे तरुणीने बचावासाठी आरडाओरड केली.
तरुणीच्या प्रतिकारानंतर आरोपीसह प्रवाशाने तिला गप्प करण्यासाठी मारहाणही केली. मात्र आरडाओरड सुरुच राहिल्याने रिक्षा चालक आणि सह प्रवाशी यांनी तरुणीला वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोखरण रोडवरील एका कंपनीजवळ निर्जनस्थळी नेऊन रिक्षातून फेकलं आणि रिक्षा सुसाट नेली.
या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालक आणि सहप्रवाशाविरोधात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात होता. अखेर नौपाडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत रिक्षाही ताब्यात घेतली आहे.
ठाण्यात रिक्षाचालकानेच प्रवासी तरुणीवर अतिप्रसंग केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. यावर ठाणे पोलिस आणि वाहतूक पोलिस विभाग यांनी अनेक उपाययोजना केल्यानंतरही पुन्हा दोन वर्षाने ठाण्यात स्वप्नाली लाड प्रकरणाची पुनरावृत्ती घडल्याचं पाहायला मिळालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement