तुळजापुरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार अमानवी, फाशीच्या शिक्षेची मागणी करणार : रुपाली चाकणकर
Tuljapur Rape News : तुळजापूर तालुक्यातील अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी शिफारस महिला आयोग (Mahila Aayog) करणार आहे, अशी माहित रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली.
Tuljapur Rape News Update: तुळजापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हे अमानवी कृत्य आहे. या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी शिफारस महिला आयोग (Mahila Aayog) करणार आहे, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ही माहिती दिली. चाकणकर यांनी आज या मुलीची आणि तिच्या कुटुंबाला भेट घेतली. मुलीच्या नातेवाईकांना मनोधैर्य योजने अंतर्गत 3 लाख रुपये मदत कऱण्यात आली आहे. पोलीस योग्य तपास करत असून 14 दिवसात गुन्हा चार्जशीट दाखल होईल. तसेच खटला फास्टट्रक कोर्टात चालेल असे चाकणकर यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून सर्व टीम चांगले काम करत आहेत. चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटवर बोलताना त्यांनी म्हटलं की, काही लोक राजकीय हेतूनेच असे ट्वीट करतात परंतु अशा केसमध्ये महिला आयोग त्या मुलीला योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या.
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील एका गावात 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करण्यात आला आहे. पीडित मुलीवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. गावकऱ्यांनी एका आरोपीला अटक करुन पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. तुळजापूर पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधमांनी मुलीच्या गुप्तांगावर वारही केले असून पीडित चिमुकली गंभीर जखमी आहे. चिमुकली घराच्या पाठीमागच्या आवारात खेळत असताना नराधमांनी संधी साधली. खेळत असलेल्या चिमुकलीला बाजूच्या शेतात नेलं. तिथे नराधमांनी चिमुकलीवर अत्याचार केला. एवढ्यावरच नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी चिमुकलीच्या गुप्तांगावर वारही केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीवर सध्या तुळजापूरच्याच उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी एका आरोपीला अटक करुन पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तुळजापूर पोलिसांत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
महिला बाल हक्क आयोगाच्या सदस्यांनी घेतली पीडितेची भेट
या गुन्ह्यातील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महिला बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड. प्रज्ञा खोसरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान महिला बाल हक्क आयोगाच्या सदस्यांनी पीडित मुलीची भेट घेऊन तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली होती. हे प्रकरण अतिशय निंदनीय असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
संबंधित बातम्या