एक्स्प्लोर

Tuljapur Crime News : धक्कादायक! तुळजापुरात 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Tuljapur Crime News : तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गावात 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला असून तुळजापूर पोलिसांत पोक्सो कायद्यानं गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Tuljapur Crime News : एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण तुळजापूर हादरलं आहे. तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील सिंदफळ गावात 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करण्यात आला आहे. पीडित मुलीवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. गावकऱ्यांनी एका आरोपीला अटक करुन पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. तुळजापूर पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

तुळजापुरात (Tuljapur Crime) घडलेल्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं आहे. अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधमांनी मुलीच्या गुप्तांगावर वारही केले असून पीडित चिमुकली गंभीर जखमी आहे. चिमुकली घराच्या पाठीमागच्या आवारात खेळत असताना नराधमांनी संधी साधली. खेळत असलेल्या चिमुकलीला बाजूच्या शेतात नेलं. तिथे नराधमांनी चिमुकलीवर अत्याचार केला. एवढ्यावरच नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी चिमुकलीच्या गुप्तांगावर वारही केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीवर सध्या तुळजापूरच्याच उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. 

घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी एका आरोपीला अटक करुन पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तुळजापूर पोलिसांत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

महिला बाल हक्क आयोगाच्या सदस्यांनी घेतली पीडीतेची भेट

तुळजापूर तालुक्यातील एका अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार झाल्याची घटना दुर्दैवी आहे. या गुन्ह्यातील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महिला बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड. प्रज्ञा खोसरे यांनी सांगितलं आहे. त्यांनी आज पीडितेची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यात काल सात वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर पीडित मुलीवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. 

दरम्यान आज महिला बाल हक्क आयोगाच्या सदस्यांनी पीडित मुलीची भेट घेऊन तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली. तसेच पोलीस प्रशासनानं दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती घेतल्यानंतर माध्यमांशी त्या बोलत होत्या. हे प्रकरण अतिशय निंदनीय असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget