आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, मात्र पोस्टिंग नाही
Tukaram Mundhe Transfer : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मात्र अद्याप त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंढेंची बदली करण्यात आली आहे
Tukaram Mundhe Transfer : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मात्र अद्याप त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंढेंची बदली (Tukaram Mundhe Transfer) करण्यात आली आहे. कोणत्या विभागात बदली झाली याबाबत अजुनही स्पष्टता नाही.
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. आयुक्त, कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावरुन त्यांना पदमुक्त करण्यात आलंय. मात्र, कुठे बदली होणार हे अजून स्पष्ट नाही.
तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे, पण अद्याप नव्या जागेवर पोस्टींग नाही. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा विक्रम झाला आहे. आतापर्यंत 16 वर्षात तुकाराम मुंढेंच्या 18 वेळा बदली झाली आहे. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. स्पटेंबर 2022 मध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात होती. या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढेंचा प्रयत्न होता. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. दोन महिन्याच्या आत मुंडे यांचा कार्यभार काढला.
आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे हे 2005 सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. ते ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणच्या नागरिकांत त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत होतं. सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंढेची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं दिसत होतं. सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र यायचे. परिणामी तुकाराम मुंढेंची बदली व्हायची. असे असले तरी नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंढेंनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केला नाही हे विशेष.
दोन महिन्यापूर्वीच झाली होती बदली, तेव्हा राज्य सरकारच्या विभागानं केलेलं ट्वीट-
#आरोग्यसेवा आयुक्तपदी मा. तुकाराम मुंढे रुजू
— Maha Arogya IEC Bureau (@MahaHealthIEC) September 30, 2022
मा. श्री. @Tukaram_IndIAS भा.प्र.से. यांनी आज शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी आयुक्त आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय #आरोग्य अभियान या पदाचा पदभार मा. डॉ. एन. रामास्वामी भा.प्र.से. यांचेकडून स्विकारला. #HealthServices pic.twitter.com/hSRJpdQiIE