एक्स्प्लोर

दिवाळीच्या तोंडावर प्रवास महागणार, डिझेल दरवाढीमुळे तिकिटात वीस ते तीस टक्के दरवाढ

दिवाळीनिमित्त मुंबई-पुण्यातून अन्य शहरांकडे जाणाऱ्या गाड्या फुल भरून जातात. तर दुसरीकडे ट्रेन तिकीट मिळत नसल्याने महागाईच्या विचित्र कात्रीत प्रवासी अडकले आहेत. 

मुंबई : वाढत्या डिझेलच्या किंमतीमुळे खासगी बस चालक दिवाळीच्या हंगामासाठी तिकीट दर वाढवण्यास सज्ज झाले आहेत. 25 तारखेपासूनच हे वाढलेले दर प्रवाशांकडून लुटण्यास सुरू होणार असून, याचा फुकटचा ताप प्रवाशांना होत आहे. 

 सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे डिझेलने शंभरी ओलांडली आहे. विविध राज्यात दर वेगवेगळे असून ते शंभर रुपये प्रति लिटरपेक्षा अधिकच आहेत. दिवाळीनिमित्त मुंबई-पुण्यातून अन्य शहरांकडे जाणाऱ्या गाड्या फुल भरून जातात. मात्र यंदा प्रवाशांना तिकिटांचे दर परवडत नसल्याने काउंटरवर चौकशी करून ते परतत आहेत. दुसरीकडे ट्रेन तिकीट मिळत नसल्याने महागाईच्या विचित्र कात्रीत प्रवासी अडकले आहेत. 

डिझेल दरवाढीसोबत, शहरातून जाताना या लक्झरी बस भरून जातात. मात्र येताना पूर्ण आरक्षण नसल्याने हे नुकसान खासगी वाहतूकदारांना सहन करावे लागते. यामुळे नाईलाजास्तव दर वाढ करावी लागत आहे, असे खासगी बस संघटनांचे मत आहे. तसेच 30 ऑक्टोबरनंतर प्रवास आरक्षण करणाऱ्याकडून सुधारित दराने तिकीट आकारणी होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांचे जुने आणि नवे दरपत्रक :

मार्ग -   सध्याचे दर शयनयान/बैठे      प्रस्तावित दर शयनयान/बैठे

बंगळुरू  1800/1300                      2100/1500

मंगळुरू   2200/1400                  3000/1800

हैदराबाद   1200/1000                 2000/1200

गोवा        900/1200                   1500/1800

कोल्हापूर   900/600                   1100/1200

राजकोट    800/1000                 1800/1500

अहमदाबाद  600/1000             1000/1200

इंदोर       1500/1000               2000-1500

 बस मालकांनी भाव वाढवल्याने बुकिंग काउंटरवर चालवणाऱ्यानी देखील आपला नफा बघून वाढ केली आहे. दरवर्षी पेक्षा यावर्षी ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रमाणेच राज्यांतर्गत ज्या बसेस कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा भागात जाणार आहेत त्यांच्या दरांमध्ये देखील 30 ते 50 टक्के वाढ करण्यात येणार आहे. आधीच सर्वत्र महागाई असल्याने गरीब मध्यम वर्गीय नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. 

दरवर्षी दिवाळीमध्ये बसच्या तिकिटांमध्ये भाववाढ केली जाते. मात्र यावर सरकारचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण का नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ST Bus Hike : सर्वसामान्यांना झटका!एसटीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Jan 2025 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊतABP Majha Marathi News Headlines 03PM TOP Headlines 03 PM 24 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Embed widget