एक्स्प्लोर
बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व्यापाऱ्याला मारहाण
बीड जिल्ह्यातील परळीमध्ये सोमवारी दुपारी भरदिवसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केली. मारहाण करणारा आरोपी गणेश कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा कार्यकर्ता असल्याचं कळतं.
बीड : बीडच्या परळी शहरात सोमवारी (17 फेब्रुवारी) दुपारी प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यापाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काठी आणि रॉडने मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे मारहाण करणारा गणेश कराड धनंजय मुंडेंचा जवळचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर जखमी अमर देशमुख यांच्यावर परळीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
परळी शहरातील पॉवर परिसरात सोमवारी भर रस्त्यात दुपारी बारा वाजता व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली. व्यापारी अमर देशमुख यांना गणेश कराड आणि त्याच्या इतर चार साथीदारांनी काठी आणि रॉडने मारहाण केली. अमर देशमुख हे मूळचे पुण्याचे आहेत. प्रॉपर्टीच्या वादातून ही मारहाण झाल्याचं म्हटलं जात आहे. अमर देशमुख यांना 5 ते 6 जण मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे.
आरोपी गणेश कराड हा सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. गणेश कराडचे व्यापारी अमर देशमुख यांच्यात प्रॉपर्टीवरुन वाद होते, त्यातूनच ही मारहाण झाल्याचं समोर आलं आहे.
अमर देशमुख यांच्यावर परळीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर गणेश कराडसह इतर चार जणांवर संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 307 अंतर्गत मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्व आरोपी फरार आहेत. गणेश कराड, शाम कराड, लाला कराड, रमेश गीते आणि मंचक गीते अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.
दरम्यान, या संदर्भात एबीपी माझा धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement