Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 30 एप्रिल 2022 : शनिवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. पुणे ते औरंगाबाददरम्यान राज ठाकरेंच्या स्वागतासाठी भरगच्च कार्यक्रम, सभेचा नवीन टीझर मनसेकडून शेअर, अमित ठाकरे सभेच्या तयारीचा आढावा घेणार
2. राज ठाकरेंनी इफ्तार पार्टीला यावं, औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तिजाय जलिल यांचं आमंत्रण, तर उद्याची सभा उधळून लावण्याचा भीम आर्मीचा इशारा
3. वंचित बहुजन आघाडीकडून 1 मे रोजी औरंगाबादमध्ये 'शांती मार्च'चे आयोजन, पोलिसांकडे परवानगी मागितली
4. राणा दाम्पत्याच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी, राजद्रोहाच्या आरोपाखाली राणा दाम्पत्याचा सात दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत मुक्काम
Navneet Rana : नवनीत राणा आणि रवी राणा दापंत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासंबंधित जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमदार रवी राणा यांच्या विरोधात 17 केसेस आहे तर खासदार नवनीत राणांविरोधात 6 केसेस आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांचा या जामीनाला विरोध आहे. राणा दाम्पत्य बाहेर पडल्यावर पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, गुरुवारी राणा दाम्पत्यानं घरचं जेवण मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला आहे.
...त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
मुंबई सत्र न्यायालयाच्या व्यस्त कामकाजामुळे या प्रकरणी गेल्या सुनावणीतच स्पष्ट करण्यात आलं होतं की, शक्य झाल्यास आम्ही शुक्रवारी ही सुनावणी घेऊ. त्यानुसार, काल याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की, याचिकाकर्ते दाम्पत्य निवडून आलेले आमदार आणि खासदार आहेत. हे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी थोडा वेळ का होईना न्यायालयाला शक्य असल्यास ते युक्तीवाद करण्यास तयार आहेत. परंतु, न्यायालयाच्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत. न्यायालयाकडे शुक्रवारी जराही वेळ नाही, असं न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात येणार आहे.
5. काल देशभरात गेल्या सव्वाशे वर्षातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद, विदर्भातल्या जिल्ह्यात पारा पंचेचाळीशी पार,
6. महाराष्ट्र दिनानिमित्त प्रेक्षकांना एबीपी माझाचं स्पेशल गिफ्ट, आज आणि उद्या दिवसभर विशेष पाहुण्यांसह माझा महाकट्टा
7. MPSC चा सुपरफास्ट निकाल; मुलाखतीनंतर अवघ्या दोनच तासात लावली मेरिट लिस्ट
8. 'जाचक कामगार कायदे रद्द करा', कामगार दिनी पुणे-मुंबई रॅली
9.भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! दोन वर्षानंतर आता पुन्हा 'चीन'मध्ये जाऊ शकतील; व्हिसावरील निर्बंध होणार माफ
10. पंजाबच्या 'किंग्स'वर लखनौचे नवाब पडले भारी, पंजाबचा 20 धावांनी पराभव