Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 10 जुलै 2022 : रविवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न, शिंदे कुटुंबातील चार पिढ्यांची उपस्थिती, तर बंडखोर आमदारांकडूनही विठ्ठलाचं दर्शन
Ashadhi Ekadashi 2022 : आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987पासून वारीची परंपरा सुरु आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. तसेच, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही गेल्या 12 वर्षांपासून पायी वारी करत आहेत.
2. दोन वर्षांनंतर पंढरपुरात भक्तीचा सागर, आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांची अलोट गर्दी, बीडच्या नवले दाम्पत्याच्या हस्ते मानाची पूजा
3. राज्यावरील दु:ख, संकट, सर्व अडचणी दूर होवो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं साकडं; यंदा वारीला मोठा उत्साह, 10 लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरीत
4. 92 नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत सरकार आयोगाशी चर्चा करणार, तर परवा सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीसाठी कायदेपंडितांशी खलबतं, भुजबळही दिल्लीत
5. मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्या, राज्यपालांच्या सूचना, तर छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्याची छात्रभारतीची मागणी
6. अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेतील मृतांमध्ये पुण्यातील दोघांचा समावेश, फक्त यलो अलर्ट देणाऱ्या हवामान विभागाचं पितळ उघडं, अजूनही बचावकार्य सुरु
7. कोकणसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी, अनेक ठिकाणी पिकांना फटका
8. आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर, श्रीलंकेचे पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांचं निवासस्थान आंदोलकांनी पेटवलं, परिस्थिती नियंत्रणाबाहेर,
9. इंग्लंड दौऱ्यातील टी-20 मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय, 49 धावांनी उडवला यजमानांचा धुव्वा, मालिका खिशात
10. विम्बल्डन स्पर्धेत महिला गटात एलेना रिबाकिना विजयी, पहिल्यांदाच कझाकिस्तानच्या खेळाडूने जिंकला खिताब