Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 09 सप्टेंबर 2022 : शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाला निरोप देण्याचा दिवस, विसर्जनासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी, चांदा ते बांद्यापर्यंतचा विसर्जनसोहळा दिवसभर माझावर
Anant Chaturdashi 2022 : आज अनंत चतुर्दशी आहे. आज दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेईल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटलं जातं. श्री गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाल्यानंतर दहा दिवस लाडक्या गणेशाची पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. या दिवशी अनेक जण उपवासही करतात
2. मुख्यमंत्र्यांकडून मध्यरात्री उपमुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन, कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचा शिंदेंचा दावा
3. काल रात्री झोडपल्यानंतर सध्या पावसाची विश्रांती, रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज, विसर्जनावरही पावसाचं सावट
4. याकूब कबर प्रकरणी दोषींवर कारवाई करणारच, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, राज ठाकरेंनी आदेश दिले तर याकूबची कबर तोडू, मनसे नेत्यांची भूमिका
5. परळीतल्या कीर्तनादरम्यान कॅमेरे बंद करण्याची मागणी करत इंदोरीकर महाराज संतापले, वाद शमवण्यासाठी धनंजय मुंडेंची मध्यस्थी
6. 40 हून अधिक जणांना जनावरांचं इंजेक्शन, अहमदनगरच्या पाथर्डीतील धक्कादायक प्रकार, बोगस जॉक्टर राजेंद्र जवंजळेला अटक
7. संकटकाळात मदतीला धावून जाणाऱ्या विघ्नहर्त्यांचा एबीपी माझाकडून सन्मान, चौथ्या विघ्नहर्ता पुरस्काराचे वितरण
8. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या 96 व्या वर्षी निधन, जगभरातून श्रद्धांजली
9. नीरज चोप्रानं पुन्हा घडवला इतिहास; प्रतिष्ठेची डायमंड लीग स्पर्धा जिंकली
Neeraj Chopra Diamond League Final : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग फायनल (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये अॅथलेटिक्समधल्या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेची मेगा फायनल पार पडली या स्पर्धेत भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने डायमंड लीगच्या भालाफेक प्रकारात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा किताब पटकावणारा नीरज चोप्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राने झुरिच येथे झालेल्या फायनलमध्ये 88.44 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपद पटकावले. नीरज 2017 आणि 2018 मध्येही फायनलसाठी पात्र ठरला होता. मात्र, त्यानंतर त्यांना अनुक्रमे सातव्या आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते
10. अफगाणिस्तानचा मोठ्या फरकानं पराभव करूनही टीम इंडियाचं आशिया टी-20 मालिकेतलं आव्हान संपुष्टात, सूर गवसलेल्या विराट कोहलीचं शानदार शतक