ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2021 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2021 | सोमवार
1. सचिन वाझे प्रकरणी कारवाईची कुऱ्हाड कोणावर? पोलीस आयुक्तांवर की, गृहमंत्र्यांवर? https://bit.ly/2PU2B23 सचिन वाझे प्रकरणावरुन महाविकासआघाडीत खलबतांना वेग! राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा, https://bit.ly/3qO1nlQ सरकारमध्ये खातेबदल होण्याची शक्यता नाही, कुणीही वावड्या उठवू नये.. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण https://bit.ly/3rJkDCh
2. पीपीई किट घातलेली सीसीटीव्हीत दिसलेली व्यक्ती सचिन वाझे असल्याचा NIA ला संशय, https://bit.ly/3rQvPwS मुकेश अंबानींच्या घराजवळ पीपीई किटमध्ये कोण होतं? फॉरेंसिक ह्यूमन अॅनॅलिसिसने उलगडा होणार https://bit.ly/2OY4z0M
3. मुख्यमंत्र्यांना सचिन वाझे यांची वकिली का करावी लागत आहे? भाजप नेते नितेश राणे यांचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप https://bit.ly/3rO073j
4. राज्यांनी वेळ वाढवून मागितल्यानंतर सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावरील सुनावणी स्थगित न करता एक आठवड्याचा वेळ वाढवला. निवडणुका आहेत म्हणून सुनावणी स्थगित करू शकत नाही, न्यायालयाची स्पष्टोक्ती https://bit.ly/2OOWoUF
5. दिवसाला 1 लाख लसींप्रमाणे 30 लाख लसींचा पुरवठा व्हावा, मुंबई महानगरपालिकेची केंद्र सरकारला विनंती https://bit.ly/2PU3qYH भारत-इंग्लंड टी-20 सामने पाहून महाराष्ट्रात परतणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करावी, शिवसेना आमदार सरवणकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3cDr1F0
6. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर लॉकडाऊन हा उपाय नाही, आरोग्य मंत्री राजेश टोपे याचं स्पष्टीकरण, कोरोना नियम पाळण्याचं कळकळीचं आवाहन, नियम पाळले नाहीत तर निर्बंध आणखी कठोर करण्याचे संकेत https://bit.ly/3lhDZvO
7. 'मराठी भाषिक वाघ आहे' असे स्टेट्स ठेवले म्हणून कन्नड पोलिसांची चार मराठी तरुणांना अमानुष मारहाण, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत असल्याचे आरोप https://bit.ly/3lgbi2t
8. विकृत पतीने पत्नीचे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावले, बुलडाण्यातील संतापजनक प्रकार.. पोलिसांमध्ये अदखलपात्र गुन्हा! https://bit.ly/3lixtVx
9. दिल्ली न्यायालयाने पोलिस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांच्या हत्येसाठी आणि 2008 च्या बाटला हाऊस चकमकीशी संबंधित अन्य खटल्यांत आरिज खानला फाशीची शिक्षा https://bit.ly/3rTyVQQ
10. खासगीकरणा विरोधात बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवस देशव्यापी संप; बँकांच्या सेवेला मोठा फटका https://bit.ly/2PU3XtF
ABP माझा ब्लॉग :
BLOG | ग्राहकांच्या हक्काच्या न्यायपूर्तीसाठी 'डिफॉल्ट डिम्ड कन्व्हेयन्स' पर्यायाचा सरकारने विचार करावा, सुधीर दाणी यांचा ब्लॉग https://bit.ly/3ljKvC9
BLOG | ग्रेट भेटीची वर्षपूर्ती, भारती सहस्त्रबुद्धे यांचा ब्लॉग https://bit.ly/3qRXJY6
ABP माझा स्पेशल :
Bumrah - Sanjana Wedding First Photos: जसप्रीत बुमराह संजना गणेशनसोबत लग्नबेडीत https://bit.ly/3tm02o4
Grammy Awards 2021 Winners List: गायिका बेयॉन्सेनं इतिहास रचला, विक्रमी 28 वेळा जिंकला अवॉर्ड https://bit.ly/3loVdHJ
Exclusive : जळगाव जिल्ह्यात नव्या लेण्यांचा शोध, सातवाहन कालीन लेणी, उत्तर मराठा कालीन शिलालेख आढळले https://bit.ly/3vpqPBI