ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2021 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
![ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2021 | सोमवार Top 10 headlines 15th February 2021 latest Marathi News ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2021 | सोमवार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/15235037/top10_web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2021 | सोमवार 1. जळगावात किनगावजवळ टेम्पोचा भीषण अपघात, 16 ठार, मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन झाला अपघात https://bit.ly/2NtCuOt अपघाताची पंतप्रधान मोदींकडून दखल, मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर https://bit.ly/2Zis3zQ
2. रविवारी राज्यात कोरोनाचे 4092 नवे रुग्ण, राज्यात दररोज मोठ्या फरकानं कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, लॉकडाऊन टाळायचे असल्यास नियम पाळावेच लागतील, आरोग्यमंत्र्यांचे संकेत https://bit.ly/2OGdBzC
3. आठ दिवसांपूर्वी नांदेड येथे खलिस्तानवादी अतिरेकी म्हणून पकडण्यात आलेला पंजाबी युवक निर्दोष, आठ दिवसांपूर्वी नांदेड येथे खलिस्तानवादी दहशतवादी म्हणून करण्यात आलेली अटक, पंजाब पोलीस व नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई https://bit.ly/37eHQnA
4. "आमचा मुलगा निर्दोष आहे कोणत्याही राजकीय व्यक्तीशी त्याचा कधीच संबंध आला नाही. केवळ दीड महिन्यांपूर्वीच माझा मुलगा पुण्याला गेला होता, "पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी अरुण राठोडच्या आईची प्रतिक्रिया, https://bit.ly/37bBPIr
5. टोलनाक्यांवर आजपासून FASTag अनिवार्य, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद, आता वाहनांना फक्त FASTag मधूनच भरता येणार टोल https://bit.ly/3qp6dqa
6. अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला ईडीकडून अटक, ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या 100 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई, अटकेपूर्वी सचिन जोशीची 18 तास चौकशी https://bit.ly/3u3hyOT
7. सर्वोच्च न्यायालयाने Facebook आणि WhatsApp ला प्रायव्हसी पॉलिसीवरुन फटकारलं, प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात युरोप आणि भारत या दोन ठिकाणी वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब केल्याने सर्वोच्च न्यायालयाची नाराजी https://bit.ly/37gAsbo
8. कोरोनामुळं बळी गेलेल्या याच कोविड योद्ध्यांच्या स्मरणार्थ आता एक नवा उपक्रम, राज्याचे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी दिली याबाबतची माहिती, कोरोनामुळं जीव गेलेल्या आपल्या माणसांना वाहता येणार श्रद्धांजली https://bit.ly/2NtVJXU
9. निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं वृद्धापकाळनं निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, न्यायमूर्ती म्हणून पी. बी. सावंत यांच्याकडून अनेक ऐतिहासिक निकालांची सुनावणी https://bit.ly/2NtCEFz
10. IND vs ENG 2nd Test Cricket Score Updates: तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडपुढची संकटं वाढली, तीन खेळाडू तंबूत माघारी, आर अश्विनच्या शतकानं भारतीय संघाच्या धावसंख्येत मोलाची भर https://bit.ly/2NtVNa6
ABP माझा स्पेशल : Web Exclusive | माघी गणेश जयंतीनिमित्त रिक्षात गणेशोत्सव https://bit.ly/37y08AD
सावधान ! तासन् तास हातात मोबाईल घेऊन बसणाऱ्या मुलांचं घरदार सोडून मुंबईत पलायन https://bit.ly/3pnnwH0
Vasant Panchami 2021 | सावळे सुंदर, रुप मनोहर... https://bit.ly/2OFqQ3z
राणीची बाग आजपासून अनलॉक! 'शक्ती' वाघ आणि 'करिष्मा' वाघीण खास आकर्षण https://bit.ly/3rV3G7v
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)