एक्स्प्लोर

P B Sawant | निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं वृद्धापकाळानं निधन

निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं वृद्धपकाळनं निधन झालं असून ते 91 वर्षांचे होते. उद्या सकाळी बाणेरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. न्यायमूर्ती म्हणून पी. बी. सावंत यांच्याकडून अनेक ऐतिहासिक निकाल देण्यात आले होते.

पुणे : निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं वृद्धपकाळनं निधन झालं आहे. वयाच्या 91व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी बाणेरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी. बी. सावंत यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडली होती. न्यायमूर्ती म्हणून पी. बी. सावंत यांच्याकडून अनेक ऐतिहासिक निकाल देण्यात आले होते.

पी. बी सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्ट, सुप्रीम हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिलं. पी. बी. सावंत 1989 ते 1995 या काळात सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती होते. 1995 मध्ये ते निवृत्त झाले होते. सेवानिवृत्त झाल्यानंतरही पी. बी. सावंत सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय होते. तसेच आग्रहानं भूमिका मांडत होते. वर्ल्ड प्रेस काऊन्सिल आणि प्रेस कऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काही काळ काम पाहिलं. तसेच यादरम्यान लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलं होतं.

पाहा व्हिडीओ : P B Sawant | निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं वृद्धपकाळनं निधन

पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचे देखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र प्रकृतीच्या कारणांमुळे ते सार्वजनिक जबाबदाऱ्यांमधून दूर होत गेले. गोध्रा दंगलीप्रकरणी स्थापित तीन सदस्यीय ट्रिब्युनलचे देखील ते सदस्य होते. तसेच इंदिरा साहनी खटल्यात मंडल आयोगाच्या शिफारसींनुसार आरक्षण लागू करण्यात आलं, त्या खंडपीठातही न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, त्यांच्याशी ओळख, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणं पुण्यातील डॉक्टरला भोवलं, गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा
Khalil Shaikh Ravindra Dhangekar : खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता 
खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता 
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
FDA Action On Siya Goyal Father Shop Pune Market: सिया गोयलच्या वडिलांच्या अडचणीत वाढ, विनापरवाना दुकान सील; आता भेसळ सिद्ध झाल्यास होणार मोठी कारवाई
सिया गोयलच्या वडिलांच्या अडचणीत वाढ, विनापरवाना दुकान सील; आता भेसळ सिद्ध झाल्यास होणार मोठी कारवाई

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget