एक्स्प्लोर
तूर उत्पादक शेतकऱ्यांनो, हतबल होऊ नका, निश्चिंत राहा : पणन मंत्री

सोलापूर : तूर उत्पादक शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये, निश्चिंत राहावं, असं आवाहन राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. शिवाय, शेतकऱ्यांची शंभर टक्के तूर खरेदी करणार, असेही सुभाष देशमुखांनी सांगितले. "शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर सरकार लक्ष ठेवून आहे. शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांची गय केली जाणार नाही.", असा इशारा देशमुखांनी दिला. अजूनही 10 लाख क्विंटल तूर खरेदी केंद्रावर असण्याची शक्यता आहे. गेल्या पंधरा वर्षातील सर्वाधिक तूर खरेदीचा विक्रम राज्य शासनाने केला. 22 एप्रिलपर्यंत नोंद असलेली सर्व तूर खरेदी करणार आहोत, असेही सुभाष देशमुख म्हणाले. तूर खरेदीला आणि पैसे मिळायला दोन महिने उलटणार? फक्त 22 एप्रिलपर्यंतच नोंदणी झालेल्या तूर खरेदीची सरकारने घोषणा केली खरी, पण 22 एप्रिलपर्यंतची तूर खरेदी करायचं ठरलं तरी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण नाफेडने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली तरी, नोंदणी झालेली तूर खरेदी करण्यासाठी महिना उलटण्याची शक्यता आहे. तूर खरेदीनंतर शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडायला किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतरही तूर खोळंबा कायम राहण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























