पेट्रोल- डिझेलच्या दरांत उच्चांकी वाढ; जाणून घ्या तुमच्या भागात काय आहेत नेमके दर
वाहन इंधनाच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्य वाहन धारकांपुढं आता मोठी आव्हानं उभी करत आहे. फक्त राज्यातच नव्हे, तर देशातही हीच परिस्थिती आहे.
![पेट्रोल- डिझेलच्या दरांत उच्चांकी वाढ; जाणून घ्या तुमच्या भागात काय आहेत नेमके दर todays petrol disel rates reson behind hike in prices पेट्रोल- डिझेलच्या दरांत उच्चांकी वाढ; जाणून घ्या तुमच्या भागात काय आहेत नेमके दर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19153245/pt.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्यानं वाढ होत आहे. मंगळवारीसुद्धा राज्यात बहुतांश भागांमध्ये पेट्रोलच्या दरांनी नव्वदी पार केली, तर डिझेलचे दरही प्रतिलीटर 80 रुपयांपलीकडेच असल्याचं पाहायाला मिळालं. वाहन इंधनाच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्य वाहन धारकांपुढं आता मोठी आव्हानं उभी करत आहे. फक्त राज्यातच नव्हे, तर देशातही हीच परिस्थिती आहे.
काय आहेत राज्यातील पेट्रोल- डिझेलचे दर?
मुंबई पेट्रोल- 91.56 डिझेल- 81.70
परभणी पेट्रोल - 94.16 डिझेल -83.17
बुलढाणा - पेट्रोल - 91.84 डिझेल - 81.96
नांदेड पेट्रोल-94.5 डिझेल- 82.89
गडचिरोली दर पेट्रोल - 92.75 डिझेल - 81.86
रायगड पेट्रोल - 91.53 डिझेल- 80.61
मनमाड पेट्रोल -91.45 डिझेल-80.57
चंद्रपूर पेट्रोल - 91.76 डिझेल - 80.90
वर्धा पेट्रोल- 92.14 डिझेल -81
पालघर पेट्रोल - 92.14 डिझेल- 81.20
धुळे पेट्रोल- 90.71 डिझेल- 80.83
रत्नागिरी पेट्रोल - 93.12 डिझेल - 82.20
कसे निर्धारित केले जातात इंधनाचे दर?
एकिकडे इंधन दरवाढीसाठी अनेकदा केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात असतानाच दुसरीकडे केंद्राच्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ठरतात. लोकांच्या या मानसिकतेत अर्धवट माहितीची भर टाकून पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ठरत असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं. पण, अर्धसत्य असल्याचं पेट्रोल डिलर असोसिएशनच म्हणणं आहे.
जेव्हा कच्च्या तेलाच्या दरात जागतिक पातळीवर वाढ होते, तेव्हा सरकार लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवतं. मात्र, जेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती कमी होतात. तेव्हा मात्र लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले जात नाहीत. 2013 साली जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत 150 रुपये प्रति बॅरल होती. तेव्हा पेट्रोल 75 तर डिझेल 65 रुपये प्रतिलीटर होतं. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत 52 रुपये प्रतिबॅरल असताना पेट्रोल नव्वदी पार तर डिझेल 80 पार पोहचलं आहे.
तुम्हाला हे माहितीये का?
सध्या पेट्रोलचा दर 91 रुपये प्रतिलीटर दिसत असला तरी केंद्र सरकारला त्यासाठी प्रतिलीटर सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयेच मोजावे लागतात. उरलेले 63 ते 64 रुपये सरकारकडून वेगवेगळ्या करांच्या नावाखाली वसूल केले जातात. एका लिटरमागे लोकांना 32 रुपये 98 पैसे एक्साईज ड्युटी म्हणून द्यावे लागतात. व्हॅटच्या स्वरुपात 15 रुपये 91 पैसै एका लिटरमागे साणान्यांना द्यावे लागतात.
राज्य सरकारच्या सेससाठी प्रतिलीटर पेट्रोलसाठी दहा रुपये 12 पैसे द्यावे लागतात. तर पेट्रोलपंप चालकांच्या कमिशनपोटी एक लीटर पेट्रोलमागे तीन रुपये 64 पैसे द्यावे लागतायत. आणि या सगळ्यांचा परिणाम पेट्रोल 91 रुपये प्रतिलीटरवर पोहोचण्यात झाला आहे. डिझेलच्या बाबतीतही चित्र वेगळं नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)