LIVE UPDATES | विरारमध्ये रेती माफियांची दहशत, पोलीस अधीक्षकांवर हल्ला
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेसंदर्भात सोनिया गांधींशी चर्चा नाही, शरद पवारांच्या गुगलीने शिवसेनेचं भवितव्य अधांतरी, संजय राऊतांची तातडीने पवारांशी चर्चा
2. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये एकसूत्रीवर चर्चाच नाही, संभाव्य महाशिवआघाडीला धक्का देणारं शरद पवारांचं विधान, आज दिल्लीत आघाडीच्या नेत्यांची पुन्हा खलबतं
3. विरोधी बाकावर बसताना शिवसेनेकडून शेतकरी प्रश्नावरुन सरकारवर हल्लाबोल, तर कधीच व्हेलमध्ये न उतरणाऱ्या राष्ट्रवादीचं मोदींकडून कौतुक, चर्चांना उधाण
4. मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांची वर्णी निश्चित, नागपुरात महापौरपद वाटून देण्याचा भाजपचा निर्णय, तर कोल्हापुरात महाशिवआघाडी
5. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, SEBC कायद्याबाबात मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान, सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी
6. सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात गस्ती पथकातले चार जवान शहीद, तर दोन जवान अत्यवस्थ, दोन सिव्हिलीयन पोर्टरचाही मृत्यू