Todays Headline 22nd July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा दिवस
आज आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा मनमाड ते संभाजीनगरपर्यंत पोहचणार आहे. सकाळी 9.30 वाजता आदित्य ठाकरे काळारामाचे दर्शन घेणार आहेत. सकाळी 11.45 वाजता सुहास कांदे यांच्यां मतदारसंघातील मनमाड शहरात होणाऱ्या मेळाव्याला आदित्य ठाकरे संबोधित करतील. दुपारी 1.40 वाजता येवला आणि दुपारी 2.45 वाजता वैजापूर येथे स्वागत संवाद होणार आहे. संध्याकाळी 5.30 वाजता संभाजीनगर येथे शिवसंवाद मेळावा होणार आहे.
आज पंतप्रधानांकडून मावळत्या राष्ट्रपतींना फेअरवेल डिनर, एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार
आज पंतप्रधान मोदींकडून दिल्लीतील हॉटेल अशोका येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना फेअरवेल डिनर दिलं जाणार आहे. यावेळी अनेक मंत्री, काही मुख्यमंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही फेअरवेल डिनरला उपस्थिती लावणार आहेत. आज दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत.
आज राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
आज 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होणार आहे. दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात येणार आहे.
चिपळूणच्या महापूराला आज एक वर्ष
चिपळूणच्या महापूराला 22 जुलैला एक वर्षे पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे चिपळूणला महापूराचा फटका बसला. त्यात सार चिपळूण उद्ध्वस्त झाले. महापुरातील आठवणी आजही कायम आहेत. लोकांच्या मनात आजही भिती कायम आहे.
आज रानिल विक्रमसिंघे यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे.
श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून रानिल विक्रमसिंघे यांनी 21 जुलै रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत
आज वेस्ट विडिंज आणि भारत पहिला एकदिवसीय सामना
इंडिज विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील आज पहिला सामना आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमरा या मालिकेत खेळणार नाहीत. त्यामुळे कर्णधार पदाची धुरा शिखर धवनवर सोपवण्यात आली आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल.