Todays Headline 13th June : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
Top News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
राहुल गांधी आज ईडी समोर हजर राहणार
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडी कडून समन्स बजावण्यात आला आहे. कोरोनामुळे सोनिया गांधी ईडी समोर हजर राहु शकणार नाही. राहुल गांधी आज हजर रहाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाताना मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचा ईडीवर हल्लाबोल
सोनिया गांधी आणि राहुल गांधींना आलेल्या ईडीच्या समन्स विरोधात कॉग्रेस आज ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड यांच्यासह इतर महत्वाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज पंढरपूरला रवाना
निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज पंढरपूरला रवाना होणार आहे. सकाळी 10 वाजता निवृत्ती नाथांच्या समाधी मंदिरापासून पालखीने मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. त्रंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन गाव प्रदिक्षणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम नाशिक जवळच्या सातपूर गावात होणार आहे.
1969 : विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन.
1967 : विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन.
विनायक पांडुरंग करमरकर ऊर्फ नानासाहेब करमरकर हे प्रसिद्ध शिल्पकार होते. मुंबईच्या ‘सर जे. जी. कला विद्यालय’ येथे ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने करमरकरांना 1962 साली ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन गौरवले.