एक्स्प्लोर

Todays Headline: भारत जोडो यात्रेचा आज सातवा दिवस, इंग्लंड-पाकिस्तानमध्ये रंगणार फायनलचा थरार, आज दिवसभरात

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

मुंबई: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आजचा सातवा दिवस असून या यात्रेला राज्यातील 250 हून अधिक लेखक आणि कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. आज ही यात्रा हिंगोलीमध्ये येणार आहे. तसेच आज इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार नाही. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत. 

भारत जोडो यात्रेचा आज सातवा दिवस

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज सातवा दिवस असून आज ही यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवास करणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला राज्यातील 250 हून अधिक लेखक आणि कलाकारांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांसह माजी सनदी अधिकारी आणि लेखक, कलाकार आज राहुल गांधीच्या यात्रेत पाहायला मिळाले.

आज लेखक, साहित्यिक दत्ता भगत , गणेश देवी, श्रीकांत देशमुख, जगदीश कदम, लक्ष्मीकांत देशमुख, भगवंत क्षीरसागर,विजय वाकडे, अभिजित शेट्ये यांच्यासह काही अन्य लेखकांनी राहुल गांधींशी भेटून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच एक पत्रही त्यांना दिले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कळवा, मुंब्रा पूलाचं उद्घाटन

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यातील दोन पुलांचं उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या पुलाचं उद्घाटन का होत नाही याबाबत ट्वीट केले होते. अखेर आज या पूलांचं उद्घाटन होत आहे. आधी तिसऱ्या कळवा पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण होईल. त्यानंतर मुंब्रा वाय जंक्शन इथे लोकार्पण होईल, तिथेच सभा होईल. विशेष म्हणजे यावेळी जितेंद्र आव्हाडही उपस्थित असतील.

मुख्यमंत्र्यांची डोंबिवलीत सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संध्याकाळी 5 वाजता डोंबिवली पूर्व कावेरी चौकात रस्त्याचं भूमीपूजन होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे.

दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

अभिनेत्री दिपाली सय्यद आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे. टेंभी नाका येथील पक्ष कार्यालयात तिचा पक्षप्रवेश होईल. दिपाली सय्यदने या आधी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. 

मुंबईत आज सायक्लोथॉन

मॅरेथॉनच्या धर्तीवर मुंबईत आज सायक्लोथॉन स्पर्धा पार पडणार आहे. यामध्ये जवळपास पाच हजाराहून अधिक स्पर्धक देशभरातून सहभागी होणार आहेत. पहाटे 4.30 वाजता बीकेसी मधून या स्पर्धेला सुरुवात होईल. वरळी- वांद्रे सिलिंग मार्गे वरळीपर्यंत ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. देशभरातील 50 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधीसुद्धा या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये टी- 20 फायनल

टी- 20 वर्ल्डकप फायनलमध्ये आज इंग्लंड आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता होणार आहे. 



 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget