मलबार हिलजवळच्या लास्ट पाम इमारतीला भीषण आग, अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या घटनास्थळी
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. 2024 मध्ये शरद पवार पंतप्रधान, औरंगाबादमध्ये रोहित पवारांकडून मनातल्या इच्छेला मोकळी वाट, लोकसभेत महाविकास आघाडीला एकत्र राहण्याचं आवाहन
2. बुलेट ट्रेनची गरज काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल, पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक लावण्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत
3.मृत्यूशी झुंजणाऱ्या वर्धाच्या निर्भयासाठी राज्यभर प्रार्थना, माझाच्या बातमीनंतर उपचाराचा खर्च सरकारनं उचलला, आरोपीच्या फाशीसाठी स्थानिकांचा धडक मोर्चा
4.शिवसेनेचा आरेतील वृक्षतोडीला विरोध, मात्र बीएमसी बजेटमध्ये 3 हजार वृक्षतोडीला परवानगी, शेलारांकडून समाचार, बजेटमध्ये मुंबईकरांवर कराचा बोजा नाही
5. 2 लाखांच्या कर्जमाफीसाठी 32 लाख शेतकरी पात्र, 15 फेब्रुवारीला पहिली यादी, कर्जमाफीसाठी आधार कार्डची पडताळणी अनिवार्य
6. अंडर नाईन्टिन विश्वचषकात युवा टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक, पाकिस्तानचा दहा विकेट्सनी धुव्वा, मुंबईकर यशस्वी जैस्वालचं नाबाद शतक, दिव्यांशची अर्धशतकी खेळी