Live Updates | हिंजवडीजवळच्या आयटी पार्कमध्ये विजेच्या झटक्याने तिघांचा मृत्यू

Background
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
देशातील आणि राज्यातील बातम्यांना संक्षिप्त आढावा...
1. आज ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 36 मंत्री शपथ घेणार, विधान भवन परिसरात शपथविधीसाठी जय्यत तयारी
2. महाविकास आघाडीत गृहमंत्रिपदासाठी जयंत पाटील, वळसे पाटलांमध्ये चुरस तर उपमुख्यमंत्रिपद अजितदादांना मिळण्याची शक्यता, ठाण्यात जितेंद्र आव्हाडांचे आभाराचे पोस्टर्स
3. शिवसेना आता बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राटही म्हणत नाही, प्रकाश जावडेकरांचा शिवसेनेला टोला, सीएए, एनआरसीबाबत योग्य संदेश पोहोचवण्यात कमी पडल्याचंही मान्य
4. कनसे नेत्याच्या मग्रुरीनंतर शिवसेना आक्रमक, कोल्हापुरात कन्नड चित्रपटाचे शो बंद, येडियुरप्पांचा पुतळाही जाळला, तर कर्नाटकला जाणाऱ्या बसेस बंद
5. पिंपरीत मेट्रो डब्यांच्या पूजनावेळी मानापमान नाट्य, मेट्रोच्या नावातच पिंपरीचा उल्लेख नसल्यानं महापौर उषा ढोरे संतापल्या, मेट्रो चाचणी होऊ न देण्याचा महापौरांचा इशारा
6. बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतला सर्वोच्च सन्मान, बिग बींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती भवनात रंगला पुरस्कार सोहळा
























