Live Updates | अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करा, धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला निर्देश
LIVE
Background
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. मुंबईत आजपासून प्लॅस्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी होणार, आदित्य ठाकरेंच्या निर्देशानंतर पालिका सज्ज, 2020 पर्यंत महाराष्ट्र प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार
2. राज्य सरकारकडून कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, 2 लाख 97 हजार 907 शेतकरी ठरले लाभार्थी, उद्यापासून खात्यात पैसे जमा होणार
3. राज ठाकरेंची मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार, शिवजयंतीसाठी 12 मार्चला राज ठाकरे औरंगाबादेत, निवडणुकीच्या तोंडावर सेनेला शह देण्याचा प्रयत्न
4. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना आज भूमिका स्पष्ट करणार, विनायक राऊत, उदय सामंत उपस्थित राहणार, तर उद्या नाणार समर्थकांची राजापुरात सभा
5. गिरणी कामगारांच्या 3 हजार 894 घरांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज सोडत, तीन मिलमधील 17 हजार गिरणी कामगारांचा सोडतीत समावेश
6. मुंबई महापालिका आयुक्तांना परवानगीशिवाय एकही झाड तोडता येणार नाही, शिवसेनेकडून आयुक्तांच्या अधिकारावर कुऱ्हाड, एकमतानं ठराव मंजूर