एक्स्प्लोर

92व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आजच्या दिवशी कविता वाचन आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आजच्या दिवशी कविता वाचन आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. साहित्य संमेलनात निरनिराळ्या प्रकाशकांच्या स्टॉलवर गर्दी पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातील लोक इथे सहभागी होताना दिसून येत आहेत. आवडत्या विषयांवरील पुस्तक खरेदीही सुरू आहे. संमेलन स्थळी गर्दी पाहायला मिळत आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा या जिल्ह्यामधील छोट्या छोट्या गावांमधून लोकं इथे सहभागी होण्यासाठी आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आमंत्रीत करण्यात आलं होत. मात्र विरोध झाल्याने आयोजकांनी सहगल यांचं आमंत्रण रद्द केलं होतं. यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. अनेक मान्यवरांनी सहगल यांचं आमंत्रण रद्द केल्याने संमेलनावर बहिष्कार टाकला होता. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी संमेलनापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मोठ्या वादांनंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. तर उद्घाटनाच्या कार्यक्रमात संमेलनाध्याक्ष ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे आणि मावळते संमेलनाध्याक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सहगल प्रकरणावर आयोजकांचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान संमेलनाच्या दुसऱ्या दिवसातील कार्यक्रमातही नयनतारा सहगल यांचा आमंत्रण रद्द केल्याबद्दल निधेष व्यक्त करण्यात आलं. काल काळ्या फिती घालून साहित्यिकांनी कवितेचं वाचन केलं आणि नयनतारा सहगल यांना निमंत्रण नाकारल्याचा निषेध नोंदवला. काय आहे वाद? या संमेलनाला उद्घाटक म्हणून इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजन समितीकडून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांच्या नावाला काही संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. मराठी साहित्य संमेलनामध्ये इंग्रजी लेखिका कशा, असे म्हणून संमेलन उधळून लावू अशी भाषा केली होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या सांगण्यावरून यवतमाळ आयोजन समितीने नयनतारा सहगल यांना पाठविलेले निमंत्रण रद्द केले होते. त्यानंतर सर्व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि विविध स्तरातून निमंत्रण रद्द केल्याबद्दल टीका करण्याात आली होती. आता त्यानंतर या संमेलनाच्या नव्या उद्घाटकाचे नाव सुचविण्यात यावे, असे महामंडळाने आयोजन समितीला सांगितले होते. यवतमाळ आयोजन समितीने काल साहित्य महामंडळाला उद्घाटक म्हणून चार व्यक्तींची नावं सुचवली होती. सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह : संमेलनाध्यक्षा अरूणा ढेरे नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह आहे. सहगल या आगळ्यावेगळ्या लेखिका असून सहगल यांचे विचार जोपासायला हवेत, अशा तिखट शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी समाचार घेतला होता. साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही, अशा लोकांमुळे वाद निर्माण होतो ते चुकीचे आहे, असे परखड मत ढेरे यांनी व्यक्त केले होते. आपण झुंडशाहीला बळी पडलो : लक्ष्मीकांत देशमुखांचे घणाघात नयनतारा सहगल यांचे आमंत्रण मागे घेणे हे अनुचित आहे. आपण झुंडशाहीला बळी पडलो आहोत. सहगल आल्या असत्या आणि भाषण केलं असत तर काही राजकीय आभाळ कोसळलं नसतं, अशा शब्दात माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघात केला होता. नयनतारा सहगल यांचा साहित्य कर्तृत्वाला सलाम करतो आणि भाषणाला सुरूवात करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Embed widget