एक्स्प्लोर
Mega block I मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे, मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मुंबईकरांनी यांची नोंद घेऊनच घराबाहेर पडावे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दोन्ही जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी या मार्गांवरील उपनगरी रेल्वे फेऱ्या पंधरा मिनिटे उशिराने धावणार आहेत.
कसा असेल आजचा मेगाब्लॉक -
मध्य रेल्वे-मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळं सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल गाड्या दिवा ते परळ स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर चालतील. परळनंतर त्या जलद मार्गावर धावतील. सीएसएमटीतून सुटणाऱ्या जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबतील. तर रत्नागिरी ते दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकापर्यंत चालवण्यात येईल.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव दोन्ही जलद मार्ग सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं जलद मार्गावर असलेल्या ब्लॉकमुळे या मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मेल-एक्स्प्रेसही उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
हार्बर मार्गावक पनवेल ते वाशी दोन्ही मार्ग सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असतील. त्यामुळं सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पनवेल ते सीएसएमटी आणि सकाळी 10 ते दुपारी सव्वातीनपर्यंत सीएसएमटी ते पनवेल, बेलापूरला जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यावेळी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील. तर सकाळी सव्वादहा ते दुपारी 4 पर्यंत पनवेल ते वाशी दरम्यानच्या अप-डाऊन फेऱ्याही रद्द राहतील. सोबतच सकाळी सव्वाअकरापासून ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेल ते ठाणे ट्रान्स हार्बरवरील फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी पावणे बारापासून ते दुपारी पावणे तीनपर्यंत नेरुळ ते खारकोपर आणि दुपारी सव्वाबारा ते दुपारी सव्वातीन पर्यंतच्या खारकोपर ते नेरुळदरम्यानच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. बेलापूर ते खारकोपर आणि ठाणे ते वाशी, नेरुळपर्यंतच्या लोकल फेऱ्या नियमितपणे धावतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement