16 January In History : छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची पुण्यतिथी; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...
आज म्हणजे 16 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. छत्रपती संभाजी (Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din) राजे यांचा छत्रपती म्हणून 16 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक झाला
On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 14 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. भारताच्या इतिहासात 16 जानेवारी ही तारीख खूप महत्वाची आणि अभिमानाची आहे. भारतीय वंशाची कल्पना चावला दुसऱ्या अंतराळ प्रवासासाठी आजच्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2003 रोजी रवाना झाली. संपूर्ण जग भारतीय मुलीच्या उल्लेखनीय कामगिरीचा साक्षीदार आहे. कल्पना चावलाने अमेरिकेत जाऊन अंतराळवीर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने तिची अंतराळ प्रवासासाठी दोनदा निवड केली. कल्पनाने स्पेस शटल कोलंबियामधून दुसऱ्यांदा अंतराळात झेप घेतली होती. दुर्देवाने हे उड्डाण तिचे शेवटचे ठरले. कारण 1 फेब्रुवारी रोजी त्यांचे अंतराळ यान क्रॅश झाले. 16 दिवसांच्या अंतराळ मोहिमेनंतर पृथ्वीवर परत आले आणि सहा इतर क्रू सदस्यांसह तिचा मृत्यू झाला. याबरोबरच आजच्या दिवशी 1681 मध्ये छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
1681 : छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला (Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din)
छत्रपती संभाजी राजे हे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते. त्यावेळी मराठ्यांचा सर्वात शक्तिशाली शत्रू मुघल सम्राट औरंगजेब याने भारतातून विजापूर आणि गोलकोंडाची सत्ता संपुष्टात आणण्यात मोठी भूमिका बजावली. संभाजी राजे यांनी सलग नऊ वर्षे औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले होते. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला त्यामुळे 16 जानेवारी हा दिवस संभाजी राजे राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. संभाजी राजांनी त्यांच्या अल्पशा कारकिर्दीत 201 युद्धे लढली आणि त्यातील एक मुख्य गोष्ट म्हणजे त्यांच्या सैन्याचा एकाही लढाईत पराभव झाला नाही. त्यांच्या पराक्रमाने व्यथित होऊन औरंगजेबाने शपथ घेतली की छत्रपती संभाजीराजे पकडले जात नाही तोपर्यंत आपल्या डोक्यावर किमोन्श ठेवणार नाही. शेवटी 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली.
1901 : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची पुण्यतिथी (Justice Mahadev Govind Ranade )
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी झाला. ते ब्रिटिशकालीन भारतीय न्यायाधीश, लेखक आणि समाजसुधारक होते. रानडे यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिकमधील निफाड या छोट्याशा गावात झाला. त्यांचा जन्म निफाड येथे झाला असला तरी त्यांचे सुरुवातीचे आयुष्य कोल्हापुरात गेले. वयाच्या चौदाव्या वर्षी मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण सुरू झाले. 1873 मध्ये त्यांची बॉम्बे प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट, बॉम्बे स्मॉल कॉज कोर्टाचे चौथे न्यायाधीश नियुक्ती करण्यात आली. 1885 पासून ते उच्च न्यायालयात रुजू झाले. ते मुंबई विधान परिषदेचे सदस्यही होते. 1893 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांचे निधन 16 जानेवारी 1901 रोजी झाले.
1938 : प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरतचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन (Sarat Chandra Chattopadhyay)
सरतचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म 15 सप्टेंबर 1876 रोजी झाला. ते बंगाली कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. ते सर्वात लोकप्रिय बंगाली कादंबरीकार होते. याशिवाय तत्कालीन बंगालच्या समाजजीवनाची झलक त्यांच्या कलाकृतींतून पाहायला मिळते. शरतचंद्र हे भारतातील सर्वकाळातील सर्वात लोकप्रिय आणि अनुवादित लेखक आहेत. 16 जानेवारी 1938 रोजी त्यांचे निधन झाले.
1943 : अमेरिकन हवाई दलाचा इंडोनेशियातील अँबोन बेटावर हवाई हल्ला
अमेरिकन हवाई दलाने इंडोनेशियातील अँबोन बेटावर आजच्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 1943 रोजी पहिला हवाई हल्ला केला.
1954 : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन
बाबूराव पेंटर यांना एक उत्कृष्ट चित्रकार आणि शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर भारतीय चित्रपट सृष्टीत यांनी मोलाची कामगिरी बजावली. चित्रकला, चित्रपटनिर्मिती, चित्रपटदिग्दर्शन, रेखाटन, शिल्पकला, प्रकाशचित्रण या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी एक वेगळाच ठसा उमटवला. भारतीय चित्रपटातील एक उत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून यांना ओळखले जाते. शिल्पकलेच्या कामासाठी यांनी स्वतःचा कारखाना सुरू केला होता. शिल्पकलेबरोबरच त्यांनी चित्रकला अवगत होती. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांनी शिल्पे कोल्हापूरमध्ये तयार केली आहेत.
1969 : सोव्हिएत अंतराळयान 'सोयुझ 4' आणि 'सोयुझ 5' प्रथमच अंतराळात सदस्यांची देवाणघेवाण झाली
सोव्हिएत स्पेस प्रोग्राम हा 1930 च्या दशकापासून 1991 मध्ये त्याचे विघटन होईपर्यंत सोव्हिएत युनियनद्वारे आयोजित रॉकेट आणि अंतराळ संशोधन कार्यक्रम होता. त्याच्या साठ वर्षांच्या इतिहासात हा प्रामुख्याने वर्गीकृत लष्करी कार्यक्रम अंतराळ उड्डाणातील अनेक अग्रगण्य कामगिरीसाठी जबाबदार होता. आजच्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 1669 रोजी सोव्हिएत अंतराळयान 'सोयुझ 4' आणि 'सोयुझ 5' प्रथमच अंतराळात सदस्यांची देवाणघेवाण झाली.
1992 : भारत आणि ब्रिटनमध्ये प्रत्यार्पण करार
अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय समुदायातील प्रत्येक देश आर्थिक दृष्ट्या इतर देशांवर जास्त प्रमाणात विसंबून आहे. सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या मार्गावर असल्यामुळे एका देशात आर्थिक गुन्हा केला असेल तर त्याचा परिणाम दुसर्या देशावरही होतो. कारण सर्वच देश विश्व व्यापार संघटनेचे सदस्य आहेत. सगळ्या देशांना समान आर्थिक, व्यापारी नियम लागू आहेत. त्यामुळेच मागील काळात जी 20 परिषदेच्या बैठकीत भारताने जाणीवपूर्वक याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. ज्या व्यक्ती एका देशातून आर्थिक गुन्हे करून पळून जातात अशा गुन्हेगार व्यक्तीला त्या देशांनी तात्काळ मायदेशी पाठवले पाहिजे. कारण हा प्रकार प्रत्येक देशाबाबत घडू शकतो. आज तशी स्थिती नसल्यामुळेच या गुन्हेगारांचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. विशेषतः, ब्रिटेनसारखा देश तर गुन्हेगारांचे नंदनवनच बनत चालला आहे. अनेक देशातील गुन्हेगार आर्थिक किंवा अन्य स्वरुपाचे गुन्हे करून इंग्लंडमध्ये पळून जातात. तेव्हा त्यांच्या प्रत्यापर्णासाठी वर्षानुवर्ष लागतात. 1992 मध्ये इंग्लंड- भारत यांच्यात प्रत्यार्पणाचा करार झाला आणि तो 1993 मध्ये अस्तित्वात आला.
1996 : हबल स्पेस टेलिस्कोपच्या शास्त्रज्ञांनी अवकाशात 100 हून अधिक नवीन आकाशगंगा शोधल्याचा दावा केला
हबल स्पेस टेलिस्कोपच्या शास्त्रज्ञांनी अवकाशात 100 हून अधिक नवीन आकाशगंगा शोधल्याचा दावा आजच्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 1996 रोजी केला.
2003 : भारतीय वंशाची कल्पना चावला दुसऱ्या अंतराळ प्रवासासाठी रवाना झाली
भारतीय वंशाची कल्पना चावला दुसऱ्या अंतराळ प्रवासासाठी आजच्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2003 रोजी रवाना झाली. संपूर्ण जग भारतीय मुलीच्या उल्लेखनीय कामगिरीचा साक्षीदार आहे. कल्पना चावलाने अमेरिकेत जाऊन अंतराळवीर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने तिची अंतराळ प्रवासासाठी दोनदा निवड केली. कल्पनाने स्पेस शटल कोलंबियामधून दुसऱ्यांदा अंतराळात झेप घेतली होती. दुर्देवाने हे उड्डाण तिचे शेवटचे ठरले. कारण 1 फेब्रुवारी रोजी त्यांचे अंतराळ यान क्रॅश झाले. 16 दिवसांच्या अंतराळ मोहिमेनंतर पृथ्वीवर परत आले आणि सहा इतर क्रू सदस्यांसह तिचा मृत्यू झाला.
2006 : समाजवादी नेत्या मिशेल बॅचेलेट यांची चिलीच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी निवड
समाजवादी नेत्या मिशेल बॅचेलेट यांची चिलीच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी 16 जानेवारी 2006 रोजी निवड झाली.