पालघरमध्ये रक्षाबंधनासाठी गेलेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला
दोन बाईकच्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन चिमुकले या अपघातात गंभीर जखमी झाले आहे.

पालघर : डहाणू चारोटी नाशिक रोडवर सारणी येथे दोन बाईकच्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन चिमुकले या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मृतांमध्ये 28 वर्षीय स्वप्निल शिंगडा, त्याची 25 वर्षीय पत्नी शर्मिला स्वप्निल शिंगडा आणि 28 वर्षीय मनोज मोहन गुहे यांचा समावेश आहे. या अपघातात शिंगडा यांचा तीन वर्षीय मुलगा आरुष सुदैवाने बचवला आहे. तर मयत मनोज गुहे यांची चार वर्षीय मुलगी मानवी हिची प्रकृती गंभीर असून तिला पुढील उपचाराकरिता सिलवासा येथे पाठविण्यात आले आहे.
डहाणू तालुक्यातील उर्से येथील रहिवाशी शिंगड़ा दाम्पत्य रक्षाबंधन करून आपल्या घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. तर गुहे वाधना येथील होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
