![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्रालयातील तीन मंत्री कार्यालये तात्पुरती बंद
मंत्रालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्रालयातील तीन मंत्री कार्यालये तात्पुरती बंद करण्याची वेळ आली आहे.
![कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्रालयातील तीन मंत्री कार्यालये तात्पुरती बंद Three ministerial offices in the mantralay are temporarily closed due to positive staffing कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्रालयातील तीन मंत्री कार्यालये तात्पुरती बंद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/12222011/mantralaya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर या आठवड्यात पार पडले. अधिवेशनानंतर मंत्री आणि त्यांच्याशी संबंधित कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची बाब समोर येत आहे. मंत्रालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्रालयातील तीन मंत्री कार्यालये तात्पुरती बंद करण्याची वेळ आली आहे.
पावसाळी अधिवेशनंतर सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम पॉझिटिव्ह आले. अधिवेशन सुरू होण्याआधी त्याआधी अध्यक्ष नाना पटोले देखील कोरोनाबाधित झाले होते. अधिवेशनाच्या वेळी देवेंद्र भुयार, राहुल नार्वेकर, गोपीचंद पडळकर,प्रवीण पोटे या आमदारांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळले तर उदय सामंत यांच्याही कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत
छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आले. तर ऊर्जामंत्री यांच्या कार्यालयातील 10 अधिकारी ,कर्मचारी घरत काम करणारा कुक पॉझिटिव्ह आले. कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने छगन भुजबळ यांनी घरात क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. नितीन राऊत मात्र बैठकांना हजेरी लावत आहेत, अस असलं तरी मंत्र्यांच्या स्टाफला कोरोना बाधा झाल्यामुळे त्यांचे कार्यालय तात्पुरते बंद करण्यात आलेलं आहे.
सध्या राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंत्रालयातील मंत्री कार्यालयात ही राज्यातून लोक कामासाठी येतात त्यामुळे खबरदारीचा उपाय करण्यात येत आहे. मंत्रालयात याआधी देखील ज्येष्ठ अधिकारी कोरोना बाधित आढळले होते त्यानंतर मंत्रालयात निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि विनियोजन आणि विधेयक हेच काम प्रामुख्याने झाले. कोरोना परिस्थिती,राज्यात आलेले नैसर्गिक आपत्ती अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा झालीच नाही. मंत्र्यांनाही प्रश्नोत्तर आणि लक्षवेधी नसल्यामुळे अधिवेशनात विशेष आपल्या खात्यात काय सुरू आहे हे मांडण्याची संधी मिळाली नाही. विरोधकांना देखील शासनाला घेरण्याची संधी मिळाली नाही. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग ठेवत आणि योग्य ती खबरदारी घेत अधिवेशन सांगता झाली.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)