हृदयद्रावक! पाणी पिण्यास शेततळ्यात गेलेल्या तीन मुलींचा मृत्यू
Solapur News Updates : सोलापूरमध्ये बुधवारी दुर्दैवी घटना घडली आहे. पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे.

Solapur News Updates : सोलापूरमध्ये बुधवारी दुर्दैवी घटना घडली आहे. पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापूर येथील मार्डी येथे शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गावातील जगताप यांच्या शेतातील शेततळ्यात बुधवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. कुटुंबासह गावावक शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाणी पिणासाठी गेलेल्या मुलींचा शेततळ्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाला. सानिका सोनार (वय १७), पुजा सोनार (वय १३), आकांक्षा युवराज वडजे (वय ११) असे बुडून मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. चुलीसाठी लागणारे जळण गोळा करण्यासाठी तिन्ही मुली शेतात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना तहान लागली. पाणी पिण्यासाठी शेततळ्यात उतरल्या तेव्हा ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात नेले आहेत. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक अरुण फुगे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटेनाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
हे ही वाचा :
Maharashtra Unseasonal Rain : राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता; बळीराजाची चिंता वाढली, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
OBC Reservation : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार? सुप्रीम कोर्टात 17 जानेवारीला महत्वाची सुनावणी
भारत बायोटेकच्या Nasal Vaccine च्या तिसऱ्या टप्यातील चाचणीच्या मंजुरीसाठी CDSCO ची शिफारस, बुस्टर डोससाठी होणार वापर
TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळ्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय; शिक्षकांकडून मागवणार 'ही' माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
