TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळ्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय; शिक्षकांकडून मागवणार 'ही' माहिती
13 फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिले आहेत.
![TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळ्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय; शिक्षकांकडून मागवणार 'ही' माहिती Maharashtra State Examination Council take Big decision after TET exam scam TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळ्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय; शिक्षकांकडून मागवणार 'ही' माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/22/7f3369b2f9680ad6aef62458075b42de_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
TET Exam Scam : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आले आहे. राज्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्र परीक्षा प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे. 13 फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे यांनी दिले आहेत. राज्यातील शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
ही करवाई अतितातडीने करण्यात येणार असून 7 जानेवारी 2022 पर्यंत म्हणजेच दोन दिवसात प्रमाणापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जे शिक्षक प्रमाणपत्र सादर करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला आहे.
शिक्षकांकडून मागवण्यात आलेली कागदपत्रे-
शिक्षकांकडून त्यांचे संपूर्ण नाव, MAHATET(महा टीईटी ) चा बैठक क्रमांक, पेपर क्रमांक, उत्तीर्ण वर्ष आणि शेरा ही संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी TET परीक्षा घोटाळ्यात आणखी एक माहिती समोर आली होती. तुकाराम सुपेंचा ड्रायव्हरचं विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकिट आरोपींना पुरवत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली होती. महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याने पाठवलेली विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकिट त्याच्या कार्यालयीन गाडीवर चालक असलेला सुनील घोलप इतर आरोपींना पाठवत असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले होते. घोलप यांच्यासह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली होती. घोलप याने 2020 मधील टीईटीमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉटस्अॅपवर पाठवत असे. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवत असल्याचे तपासात समोर आली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)