एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवस्मारकासाठी तीन वेगवेगळ्या जागांचे प्रस्ताव!
शिवस्मारकावरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग सुरु असताना आता माजी व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव यांनी देखील सरकारवर गंभीर आरोप केला आहे. शिवस्मारक प्रकल्पाच्या वैधतेबाबत विविध संस्थांनी दिलेला अहवाल सरकारच्या दबावाखाली देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप राव यांनी केला आहे. शिवस्मारक पायाभरणी बोट दुर्घटनेत सिद्धेश पवारचा मृत्यू झाल्यानंतर स्मारकाच्या जागेवरून बराच वाद निर्माण झाला आहे.
मुंबई : शिवस्मारकाच्या पायभरणीच्या कार्यक्रमात झालेल्या बोट अपघातानंतर आता स्मारकाच्या प्रस्तावित जागेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हे स्मारक अरबी समुद्रात न होता अन्यत्र ठिकाणी व्हावे अशी मागणी होऊ लागली आहे. या अपघातात एक बळी गेल्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शिवस्मारक राजभवन येथे करण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघाकडून समोर आली आहे तर माजी व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव यांनी आपली मुंबई या संस्थेद्वारे स्मारक भाऊच्या धक्क्यापासून एक किमी अंतरावर क्रॉस आयलंडवर करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात न होता जमिनीवर व्हावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि समन्वयक शांताराम कुंजीर यांनी केली आहे. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने मात्र हे स्मारक आहे त्याच जागी करावे, अशी मागणी केली आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र स्मारक नियोजित जागीच करावे असे मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
शिवस्मारकच्या वैधतेबाबत विविध संस्थांचे अहवाल सरकारच्या दबावाखाली : राव
यासाठी त्यांनी प्रस्तावित शिवस्मारक स्थळाभोवतीची समुद्राची भौगोलिक परिस्थिती आणि नेव्हीगेशन रूटचा दाखला दिला आहे. शिवस्मारक प्रकल्पाच्या वैधतेबाबत विविध संस्थांनी दिलेला अहवाल सरकारच्या दबावाखाली देण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही राव यांनी केला आहे. शिवस्मारकावरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग सुरु असताना आता माजी व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव यांनी देखील सरकारवर गंभीर आरोप केला आहे. शिवस्मारक प्रकल्पाच्या वैधतेबाबत विविध संस्थांनी दिलेला अहवाल सरकारच्या दबावाखाली देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप राव यांनी केला आहे.
रायगड किल्ल्याच्या परिसरात एखाद्या डोंगरावर स्मारक करा: संभाजी ब्रिगेड
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात न होता जमिनीवर व्हावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि समन्वयक शांताराम कुंजीर यांनी केली आहे. शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी मागणी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडकडून अनेक वर्षे होत असली तरी आताची स्मारकाची जागा आम्ही सुचविलेली नाही.आम्ही एस्सेल वर्ल्ड जवळील जागा आणि बांद्र्याची एक जागा सुचवली होती. मात्र विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ती जागा सुभाष घईंना देण्यात आल्याचे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे. शिवाज महाराजांचे स्मारक समुद्रात होण्याऐवजी रायगड किल्ल्याच्या परिसरात एखाद्या डोंगरावर व्हाव आशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून त्यांनी केलीय. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांच संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाला पुरेसा निधी देण्यात येउन त्या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला गालबोट लागले. कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाल्यामुळे सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी भरलेली स्पीडबोट समुद्रात निघाली होती. शिवसंग्रामचा कार्यकर्ता असलेल्या मामासोबत सिद्धेश बोटीने निघाला होता. त्यावेळी बोट दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला. शिवस्मारक पायाभरणी बोट दुर्घटनेनंतर स्मारकाच्या जागेवरून बराच वाद निर्माण झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement