एक्स्प्लोर

सोलापूर पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 2  इथं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

Indapur Accident News :  इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 2  इथं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात इको गाडीतून प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांपैकी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आदिती हातेकर, सखुबाई गेजगे व जय  हातेकर, सर्व रा. सांगोला, जि. सोलापूर यांचा समावेश आहे. 

नेमका कसा झाला अपघात?

अपघातात इको गाडीचे चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय 50 वर्षे, रा. पाटस) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच स्वाती कबीरदास गेजगे (वय 34 वर्षे) व समृद्धी कबीरदास गेजगे (वय 10 महिने), दोघीही रा. पाटस या किरकोळ जखमी झाल्या आहेत. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरपुणे लेनवरून जाणारा आयशर टेम्पो याचा टायर अचानक पंचर झाल्याने वाहन चालकाने तो टेम्पो महामार्गाच्या साईडला अर्धवट आणि धोकादायक स्थितीत उभा केला होता. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीच्या इको या चारचाकी वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी भिगवण पोलीस स्टेशन पुढील तपास सुरु आहे.

भिवंडीत डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले

भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात हायवा डंपरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य झाला आहे. भार्गव पाटील (वय 24 रा. खारबाव)  असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. तसेच अपघातानंतर नारपोली पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदना करिता शहरातील शासकीय स्व.इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

नेहमीप्रमाणे भार्गव कामावरून आपल्या घरी जात असताना रस्त्यावर अचानक भरधाव डंपरने धडक दिल्याने दुचाकीसह भार्गव थेट डंपरच्या खाली पडल्याने टायर खाली येऊन चिरडला गेला. ज्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे धक्कादाय घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनेची माहिती नारकोली पोलिसांना दिली मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  तर वाहन चालकाच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget