एक्स्प्लोर
नागपुरमध्ये केसांची चोरी, दोन चोरांना सीसीटीव्हीच्या मदतीने पकडले
चोर ही चोरी करताना आणि पोत्यांमध्ये चोरलेले सामान घेवून जात असताना सीसीटीव्हीत चित्रीत झाले आहेत. तक्रारीनंतर पोलिसांनी चोरांना अटक केली आहे.
नागपूर : आजवर तुम्ही अनेक वस्तूंच्या चोरीच्या घटना ऐकल्या असतील, मात्र कधी डोक्यावरच्या केसांच्या चोरीची घटना ऐकली आहे का?. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात मात्र केसांच्या चोरीचा प्रकार समोर आला आहे. दोन चोरट्यांनी केलेली केसांची चोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
या चोरट्यांनी चार पोत्यांमध्ये भरून 50 किलो केस चोरले आहेत. नागपुरातील विनोद शिंदे यांचा केस खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. गणेशपेठ परिसरात त्यांचे त्यांचे दुकान असून तिथून ते हे केस विग तयार करण्यासाठी तसेच अमिनो एसिड तयार करणाऱ्या कारखान्याला विकतात. विशाल गायकवाड आणि विशाल रॉय या दोन चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून 4 पोते भरून डोक्यावरील केसं चोरले आहेत. तशी तक्रार शिंदे यांनी दिली आहे. केसांसोबतच 70 हजारांची रोकडही चोरली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विशाल गायकवाड आणि विशाल रॉय हे चोर ही चोरी करताना आणि पोत्यांमध्ये चोरलेले सामान घेवून जात असताना सीसीटीव्हीत चित्रीत झाले आहेत. तक्रारीनंतर पोलिसांनी चोरांना अटक केली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरलेले हे डोक्यावरील केस हे मेन्स कटिंग सलूनमधील कापलेले केसं नसून ते महिलांनी केस विंचरताना गळणारे केसं आहेत. त्यामुळे या केसांची किंमत सुमारे 4 ते 5 हजार रुपये प्रती किलोपर्यंत असते. म्हणूनच चोर या केसांच्या चोरीच्या मागे लागले होते. या चोरीच्या प्रकरणानंतर नागपुरात चर्चेचा बनला आहे.
दरम्यान आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून केस जप्त करण्यात आले आहेत. महिलांच्या केसांना किंमत असल्याने ह्या केसांची चोरी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement