![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त काढून दिलेले पंडित शर्मा यांना धमक्यांचे फोन
राम मंदिराच्या भूमी पूजनाचा मुहूर्त बेळगावचे पंडित विजयेन्द्र शर्मा यांनी काढून दिला होता. आता राम मंदिराचे भूमिपूजन बुधवारी होणार आहे. पण मुहूर्त काढून दिलेले पंडित विजयेन्द्र शर्मा यांना आता धमक्यांचे फोन येत आहेत.
![राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त काढून दिलेले पंडित शर्मा यांना धमक्यांचे फोन Threatening phone call to Pandit Sharma who removed the moment of Ram Mandir Bhumi Pujan राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त काढून दिलेले पंडित शर्मा यांना धमक्यांचे फोन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/04030145/IMG_20200803_210323.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमी पूजनाचा मुहूर्त काढून दिलेले पंडित विजयेन्द्र शर्मा यांना धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत.त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शर्मा यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.अयोध्येतील राम मंदिराच्या भूमी पूजनाचे चार मुहूर्त पंडित शर्मा यांनी काढून दिले होते.
राम मंदिराच्या भूमी पूजनाचा मुहूर्त बेळगावचे पंडित विजयेन्द्र शर्मा यांनी काढून दिला होता. आता राम मंदिराचे भूमिपूजन बुधवारी होणार आहे. पण मुहूर्त काढून दिलेले पंडित विजयेन्द्र शर्मा यांना आता धमक्यांचे फोन येत आहेत. या प्रकरणी पंडित शर्मा यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. रेल्वे ओव्हरब्रिज जवळील राघवेंद्र नववृंदावनचे प्रमुख असलेले पंडित शर्मा यांच्या मठा जवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.वेगवेगळ्या ठिकाणाहून हे फोन आले आहेत.
अयोध्येतील राम मंदिराचे ट्रस्टी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी शर्मा यांच्याशी संपर्क साधून राममंदिर भूमीपूजनासाठी शुभ मुहूर्त काढून देण्यास सांगितले होते. त्यानुसार शर्मा यांनी त्यांना चार शुभ मुहूर्त पाठवले होते. 29 जुलै सकाळी नऊ नंतर, 31 जुलै सकाळी सात ते नऊ दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी सकाळी दहा नंतर आणि 5 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस असे ते चार मुहूर्त होते. त्यापैकी पाच ऑगस्ट चा मुहूर्त राम मंदिर भूमीपूजनासाठी निश्चित करण्यात आला आहे. 15 जून रोजी हे चार मुहूर्त स्वतः पत्र लिहून शर्मा यांनी स्वामी गोविंद देवगिरी महाराज उर्फ किशोरजी व्यास यांना कळवले होते.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)