एक्स्प्लोर
हजारो संगणक परिचालकांचं पद निश्चितीसाठी बेमुदत उपोषण
राज्यातील 27 हजार 864 ग्रामपंचायती, 351 पंचायत समिती व 34 जिल्हा परिषदेत एकूण 23 हजार 734 संगणक परिचालक आहेत. त्यांना दरमहा सहा हजार मानधन देण्यात आहे. ते तुटपुंजे मानधनही वेळेत मिळत नसल्याची या परिचालकांची तक्रार आहे.

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये विविध 29 प्रकारचे ऑनलाईन दाखले देण्याचे काम करणारे हजारो संगणक परिचालकानी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात बेमुदत आंदोलन पुकारलं आहे.
यासाठी हजारो संगणक परिचालक आझाद मैदानात उतरले आहेत. राज्यातील 27 हजार 864 ग्रामपंचायती, 351 पंचायत समिती व 34 जिल्हा परिषदेत एकूण 23 हजार 734 संगणक परिचालक आहेत. त्यांना दरमहा सहा हजार मानधन देण्यात आहे. ते तुटपुंजे मानधनही वेळेत मिळत नसल्याची या परिचालकांची तक्रार आहे.
संग्राम प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीचा आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला होता. भाजप सरकारने त्याच कंपनीला 'आपले सरकारचे' काम दिल्यामुळे आमची परवड होत असल्याचा परिचालकांचा आरोप आहे.
'आपले सरकार'सेवा केंद्राचे संचलन दिल्लीची 'सीएससी एसव्हीपी' कंपनी करते. त्या कंपनीकडून परिचालकांचे मानधन दिले जात नाही. स्टेशनरीचा पुरवठा वेळेत होत नाही, प्रशिक्षण दिले जात नाही, बोगस सॉफ्टवेअर पुरवली जातात असे अनेक गंभीर आरोप परिचालकांच्या संघटनेद्वारे करण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
