Bacchu Kadu: दिव्यांग प्रमाणपत्रावर डल्ला मारणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढला पाहिजे, बच्चू कडू आक्रमक
Bacchu Kadu: मला वाटते आता लाडका मुख्यमंत्री आला पाहिजे म्हणजे सगळे प्रश्न मिटतील, असे बच्चू कडू म्हणाले.
अमरावती : पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणानंतर बनावट प्रमाणपत्राचा आधार घेत अनेक जण अधिकारी झाल्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहे. काही जणांनी दृष्टीदोष असल्याचे सांगितले तर काहींनी लोकोमोटिव्ह डिसऑर्डर असल्याचे सर्टिफिकेट दाखल केले. काहींनी ईडब्ल्यूएस कोट्यातून नोकरी मिळवली. यावर प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. दिव्यांग प्रमाणपत्रावर डल्ला मारणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढला पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले. ते हिंगोलीत बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, पूजा खेडकर यांचं बोगस प्रमाणपत्र आढळल्यानंतर माझ्याकडे दीडशे नाव आले आहेत. त्याबद्दल आम्ही मुख्य सचिव यांना पत्र दिले आहे. 22 पर्यंत कारवाई करण्यासाठी आम्ही वेळ दिलेली आहे. यातील दीडशे लोक शासकीय सेवेत आहेत,त्यांनीच जास्त गोंधळ घातलेला आहे. ज्यांच्या घरात अधिकारी कर्मचारी आहेत,त्यांनी हे धाडस केले आहे. ज्याला हात नाहीत पाय नाहीत,अशा लोकांवर डल्ला मारला आहे. अशा लोकांचा कोथळा बाहेर काढला पाहिजेत.
... आता लाडका मुख्यमंत्री आला पाहिजे : बच्चू कडू
लाडकी बहीण, लाडका भाऊ आणली जात आहे आता लाडका मतदार आणा म्हणजे थेट पैसे वाटता येतील असे राज ठाकरे म्हणाले होते. यावर बच्चू कडू यांना विचारलं असता, मला वाटते आता लाडका मुख्यमंत्री आला पाहिजे म्हणजे सगळे प्रश्न मिटतील असे कोपरखळी मारली. आम्हीच लाडका मुख्यमंत्री, लाडका आमदार खासदार योजना आणणार आणि त्यांना प्रहार 15 हजार रुपये वाटप करणार असल्याचे म्हटलंय.
मराठा कुणबी काय लुटारू आहेत की दरोडेखोर?, बच्चू कडूंचा सवाल
प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंना विचारलं असता मराठा कुणबीपासून सावध राहा म्हणजे मराठा कुणबी काय लुटारू आहेत का की दरोडेखोर आहेत?, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातींना कसे स्थान देता येतील हे पाहिलेले आहे. ते घटनेत सुद्धा आहेत,त्यामुळे बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत. जेव्हा प्रकाशजी मराठा कुणबीबद्दल असे बोलतात याच खरंतर दुःख वाटतय. प्रकाशजी बाबासाहेबांचे वंशज असल्याने त्यांच्या विरोधात आम्ही सांभाळून बोलतो नाहीतर बाबासाहेबांचा अपमान होईल,त्यामुळे आम्ही सांभाळूनच बोलत असतो.
राज ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्र पाहून घ्यावा : बच्चू कडू
राज ठाकरे यांनी आणखीन पूर्ण महाराष्ट्र पहिला नाही, त्यामुळे महाराष्ट्र पाहून घ्यावा म्हणजे त्यांना महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे की नाही ते समजेल असे आमदार बच्चू कडू म्हणाले.
हे ही वाचा :
Bacchu Kadu : बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीसाठी शड्डू ठोकला; राजू शेट्टी, मनोज जरांगेसह एमआयएम सोबतही खलबतं