एक्स्प्लोर
आमदारांवर हल्ल्याची तयारी, त्याआधीच पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. मात्र, या नक्षलवाद्यांच्या रडारवर अनुसूचित जमाती कल्याण समितीतील आमदार होते, अशी खळबळजनक माहिती शहापूरचे आमदार आणि समितीचे सदस्य पांडुरंग बरोरा यांनी दिली आहे.
गडचिरोली/पालघर : गेल्या 38 वर्षातली सर्वात मोठी कारवाई करत पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड भागात सी-60 या नक्षलवादी विरोधी पथकाने 13 नक्षलवाद्याना कंठस्नान घातलं. गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. मात्र, या नक्षलवाद्यांच्या रडारवर अनुसूचित जमाती कल्याण समितीतील आमदार होते, अशी खळबळजनक माहिती शहापूरचे आमदार आणि समितीचे सदस्य पांडुरंग बरोरा यांनी दिली.
अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या आमदारांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी येणार होते, अशी गुप्त माहिती पोलिसांना होती. याच भामरागड नक्षली भागाच्या दौऱ्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा, नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभेचे आमदार वैभव पिचड, पालघर येथील विधानपरिषद आमदार आनंद ठाकूर, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे आणि पालघर जिल्ह्यात डहाणू विधानसभेचे आमदार अमित घोडा हे होते.
या परिसरात वाहनाने जाण्यासाठी आमदारांच्या समिती सदस्यांना पोलीसांनी मनाई केली होती. मात्र, या परिसरातील आदिवासींचे जीवनमान, त्यांना मिळणाऱ्या शासकीय योजना यांची पाहणी करण्यासाठी समिती सदस्यांनी आग्रह धरला.
या ठिकाणी जाण्यासाठी खास हेलिकॉप्टर मागावून अहेरी ते भामरागड प्रवास केला. मात्र, या समिती दौऱ्याला लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी नजर ठेवून होते. त्या नक्षलवाद्यांवर गडचिरोलीतील सी-60 नक्षलवादी विरोधी पथकाची नजर होती. संधी मिळताच पहाटेच्या सुमारास 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करून आजपर्यंतची सर्वात मोठी नक्षलविरोधी कारवाई पोलिसांनी केली.
गडचिरोलीत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत तब्बल 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. डीव्हीसीचे सदस्य असलेले साईनाथ आणि सिनू या दोघांनाही ठार मारण्यात आलं. राज्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.
43 वर्षांचा सिनू हा मूळ वारंगलचा असून त्याचं खरं नाव विजयेंद्र राऊते. सुरुवातीला तो आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत होता. 2003 मध्ये गडचिरोलीत तो दाखल झाला.
अनेक जबाबदाऱ्या पार पाडत काही वर्षांपासून तो दक्षिण गडचिरोली डिव्हीजनचा सचिव झाला. सिनूची पत्नीही नक्षल चळवळीत असल्याची माहिती आहे. मात्र ती पैसे घेऊन पळाल्यामुळे चळवळीत त्यांच्याविरोधात असंतोष होता.
साईनाथ हा पेरीमिली दलम कमांडर, त्याला डिव्हीजनल कमिटी सदस्य बनवण्यात आलं होतं. साईनाथ अत्यंत सक्रिय होता. त्याचं वय 35 वर्षांच्या घरात होतं. सातत्याने गडचिरोलीत होत असलेल्या अनेक नक्षली कारवाया आणि हत्याकांडाचा तो सूत्रधार होता.
संबंधित बातमी :
गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत 13 माओवाद्यांना कंठस्नान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement