एक्स्प्लोर
VIDEO: सराफा दुकानातून मंगळसूत्र लांबवणाऱ्या तिघी सीसीटीव्हीत कैद
बेळगाव: बेळगावमध्ये एका सराफी दुकानात तीन महिलांनी केलेली चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या तीनही महिलांनी दुकानातील मंगळसुत्रावर डल्ला मारुन तिथून पोबारा केला.
काकतीवेस भागातल्या अलंकार ज्वेलर्समध्ये तीन महिला मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. एका महिलेनं मंगळसूत्र दाखवण्याची विनंती केली. पण मंगळसूत्र दाखवत असतानाच दुसऱ्या महिलेनं दुकानदाराचं लक्ष दुसरीकडे वेधलं आणि त्याचवेळी पहिली महिला मंगळसूत्र कसे दिसते, हे पाहण्याच्या बहाण्यानं मागे वळली. त्यानंतर हातचलाखीनं तिनं आपल्या साथीदार महिलेच्या हाती ते मंगळसूत्र दिलं. त्यानंतर या तीनही महिलांनी दुकानातून काढता पाय घेतला
दरम्यान, याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या पोलीस सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे आता या तीनही महिलांचा शोध घेत आहेत.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement