एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यमंत्र्यांना महापूजेपासून रोखणारे रामभाऊ अद्यापही तुरुंगात
आपल्याला वाऱ्यावर सोडल्याची रामभाऊ गायकवाडची पोस्ट व्हायरल झाल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी एकादशीच्या महापूजेपासून रोखणारा सकल मराठा मोर्चाचा रामभाऊ गायकवाड अद्यापही तुरुंगातच असल्याचं समोर आलं आहे. आपल्याला वाऱ्यावर सोडल्याची त्याची पोस्ट व्हायरल झाल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला होता. यावेळी आंदोलनात पुढे असणाऱ्या रामभाऊ गायकवाडला 10 ऑगस्टला अटक झाली होती. या घटनेला दोन महिने उलटल्यानंतरही गायकवाडला अद्यापही जामीन मिळालेला नाही.
या पोस्टवर मराठा मोर्चाने रामभाऊला वाऱ्यावर सोडल्याचं म्हटलं आहे. मात्र मराठा मोर्चा रामभाऊच्या कुटुंबाला सर्व ती मदत करत आहे. आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडलं नसल्याचं मराठा मोर्चाचे समन्वयक मोहन अनपट यांनी सांगितलं.
दरम्यान, गायकवाड हे अद्यापही जेलमध्येच असल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. गेल्या दोन महिन्यापासून पती जेलमध्ये गेल्याने आजारी आई आणि लहान दोन मुलींची काळजी आपल्यालाच घ्यावी लागत असल्याचं त्यांची पत्नी सांगते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
अहमदनगर
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement